NCP: राष्‍ट्रवादी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार

राष्‍ट्रवादी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार
satish patil
satish patilsaam tv

पारोळा (जळगाव) : गेल्या ४० वर्षांच्या राजकारणात कोणताही वैरभाव न ठेवता कार्यकर्त्यांच्या सोबतीने लढण्याचा प्रयत्न केला. एकाकी झुंज देऊन यश मिळवले. आता येणाऱ्या निवडणुकीत कोणतीही आघाडी न करता राष्ट्रवादीच्या (NCP) चिन्हावरच निवडणूक लढवली जाईल. असे मत माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील (Satish Patil) यांनी मांडले. (jalgaon news NCP will contest the forthcoming elections on its own)

satish patil
खर्चासाठी मागितले पैसे..संपामुळे पगार नसल्‍याचे सांगून बाप आंदोलनात अन्‌ मुलाने घेतला गळफास

पारोळा (Parola) येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या आवारात तालुक्यातील सरपंच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील, व्यापार व उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोराज पाटील, प्रा. आर. व्ही. पाटील यांनी मनोगत व्यक्त करत येणाऱ्या काळात राष्ट्रवादीची (Jalgaon NCP) सत्ता सर्व संस्थांमध्ये काबीज करण्यासाठी प्रयत्न करू, अशी खूणगाठ बांधली.

प्रत्‍येक संस्‍थेत राष्‍ट्रवादीची सत्‍ता आणणार

माजी पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले, की तालुक्यातील सहकार क्षेत्रात लक्ष घालण्याची गरज असून, प्रत्येक संस्थेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे. गावपातळीवर विकास सोसायटीकडे दुर्लक्ष न करता पदाधिकाऱ्यांनी विकास सोसायटी ताब्यात घेण्यासाठी मेहनत घ्यावी. स्वतः बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहील. यासाठी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणुकीत सहभागी होऊन तालुक्यातील सोसायट्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com