मुसळधार पावसाने केले उध्‍वस्‍त; नाल्‍यातील पुरात पती बेपत्ता तर बैलांचा मृत्यू; पत्नी बचावली

मुसळधार पावसाने केले उध्‍वस्‍त; पत्नी बचावली, पती बेपत्ता तर बैलांचा मृत्यू
मुसळधार पावसाने केले उध्‍वस्‍त; नाल्‍यातील पुरात पती बेपत्ता तर बैलांचा मृत्यू; पत्नी बचावली

जळगाव : निंभोरा (ता. धरणगाव) येथील दांपत्य शेतातील काम आटोपून घराकडे परतत असताना नाल्याला आलेल्या लोंढ्यात बैलगाडीसह वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत पती वाहून गेल्याने बेपत्ता असून सुदैवाने पत्नी बचावली आहे. अपघातात बैलगाडीला जुंपलेले दोघे बैल मृत्युमुखी पडले असून, नाल्यातच ते मृतावस्थेत आढळून आले. सायंकाळी सातपर्यंत घटनास्थळाजवळ आणि रात्री उशिरापर्यंत नाल्याच्या काठावरील गावांत शोधकार्य सुरू होते.

निंभोरा येथील भागवत भिका पाटील (वय ५५) व त्यांच्या पत्नी मालूबाई (वय ५०) हे शेतकरी दांपत्य नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस वाढण्याची शक्यता असल्याने पाटील दांपत्य बैलगाडीने घरी परत येत होते. तासाभरापूर्वी झालेल्या पावसामुळे निंभोरा ते खामखेडा या दोन्ही गावांमधून जाणाऱ्या खैरी नाल्याला पाणी आले होते. नाल्याच्या पाण्यात बैलगाडी टाकताना पाण्याचा अंदाज न आल्याने आणि अचानक लोंढा वाहत आल्याने नाल्यात अर्धवट उतरवलेल्या बैलगाडीसह भागवत पाटील यांच्यासह पत्नी मालूबाई वाहून गेले.

मुसळधार पावसाने केले उध्‍वस्‍त; नाल्‍यातील पुरात पती बेपत्ता तर बैलांचा मृत्यू; पत्नी बचावली
रत्नागिरीत भाती शेती धाेक्यात; पुढचे 18 तास महत्वाचे

सुदैवाने मालूबाई वाचल्या

बैलगाडीसह वाहून गेल्यानंतर मालूबाई पाटील नाल्याच्या काठावरील झुडपांमध्ये अडकल्या. मात्र, भागवत पाटील व दोन्ही बैल पाण्यात दूरपर्यंत वाहत गेले. थोड्या अंतरावर दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला तर वाहून गेलेले भागवत पाटील बेपत्ता झाले. भागवत पाटील यांच्यामागोमाग शेतातून घराकडे परतणाऱ्या ग्रामस्थांच्या सदर घटना लक्षात आल्याने तातडीने त्यांनी गावातील इतर ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण गाव नाल्याच्या काठी एकवटले. शोधकार्यादरम्यान ग्रामस्थांना झुडपामध्ये अडकलेल्या मालूबाई आढळून आल्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना धरणगाव येथे नेत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com