निलगायच्या धडकेत रिक्षा उलटून एक ठार, चार जखमी

निलगायच्या धडकेत रिक्षा उलटून एक ठार, चार जखमी
Accident
AccidentSaam tv

जळगाव : भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या रिक्षाला दुरदर्शन टॉवरजवळ रस्ता ओलांडणाऱ्या निलगायने जोरदार धडक दिली. अपघातात भरधाव रिक्षा उलटून एक जण जागीच ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Jalgaon Medical collage) उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. साबीर सत्तार बागवान (वय-४० रा. जाम मोहल्ला, भुसावळ) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (jalgaon news One killed four injured in rickshaw overturn)

Accident
बिल भरणाप्रश्‍नी फेक मेसेज; महावितरणचा ग्राहकांना सावधानतेचा इशारा

भुसावळकडून जळगावकडे (Jalgaon) येणारी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ९५२१) येत असतांना दुरदर्शन टॉवरजवळ राष्ट्रीय महामार्गावरून निलगाय रस्ता ओलांडत असतांना सुसाट रिक्षावर आदळली.या अपघातात (Accident) रिक्षा उलटून रिक्षात बसलेला शाबीर सत्तार बागवान याला डोक्याला जबर दुखापत झाल्याने तो जागीच मृत्यू झाला. तर रिक्षा चालक मोहम्मद आलम मोहम्मद जान (वय ४८ रा. भुसावळ), बबता कन्हैय्याल बडगुजर (वय ४५ रा. पिंपळगाव ता. एरंडोल), नसरीनबी चांद बागवान (वय ५५ रा. धुळे) आणि साहिल मकबल बागवान (वय १३ रा. तांबापूरा) असे चौघे गंभीर जखमी झाले आहे.

रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी

अपघात झाल्यानंतर चौघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यावेळी रूग्णालयात नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. अपघात घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com