डॉक्‍टराचा सुरवातीला नकार नंतर रुग्ण महिलेला केले रक्‍तदान अन्‌..

डॉक्‍टराचा सुरवातीला नकार नंतर रुग्ण महिलेला केले रक्‍तदान अन्‌..
डॉक्‍टराचा सुरवातीला नकार नंतर रुग्ण महिलेला केले रक्‍तदान अन्‌..

पाचोरा (जळगाव) : डॉक्टर खरोखरच देवरूपी मानव आहे, याची प्रचिती येथील पाचोरावासीयांना आली. उपचारासाठी दाखल गरोदर मातेला स्वतःचेच रक्त देऊन डॉक्टरांनी अत्यवस्थ माता व बालकाचे प्राण वाचविले. (jalgaon-news-pachora-Blood-donation-made-to-the-patient-woman-after-the-initial-refusal-of-the-doctor)

शहापुरे (ता. पाचोरा) येथील स्वीटी खरे अत्यवस्थ असल्याने तिचे पालक शहरातील रुग्णालयांचे दार ठोठावत होते. काही डॉक्टरांनी त्यांना जळगावला जाण्याचा सल्ला दिला. कारण महिलेच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण चार, तर प्लेटलेट १८ हजारापंर्यंत होत्या. या गरोदर महिलेचे सासरे अर्जुन खरे यांच्यासमोर अत्यवस्थ असलेल्या गरोदर सुनेला कोठे न्यावे, ही चिंता भेडसावत होती. त्यांनी मध्यरात्री येथील नातलग अरुण ब्राह्मणे यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी खरे यांना धीर देत भाजपचे नंदू सोमवंशी व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याशी संपर्क साधून सुनेला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यासाठी मदतीचे आवाहन केले.

डॉक्‍टरांचाही होता नकार

सोमवंशी बंधूंनी भडगाव रोड भागातील लीलावती हॉस्पिटलचे डॉ. वैभव सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून त्यांना या महिलेवर उपचारासाठी विनंती केली. मात्र, स्वीटी खरे यांची अवस्था व त्यांच्या शरीरातील रक्त व प्लेटलेटचे प्रमाण पाहता तेही भयभीत झाले. सोमवंशी यांनी आपण उपचार सुरू करा, काही अघटित घडले, तर त्यास आम्ही जबाबदार राहू, आपणास कोणत्याही त्रास होणार नाही, असे आश्वासित केल्याने डॉ. सूर्यवंशी यांनी गरोदर महिलेवर उपचार सुरू केले.

डॉक्‍टराचा सुरवातीला नकार नंतर रुग्ण महिलेला केले रक्‍तदान अन्‌..
नदीत विषारी रसायन; माशांच्‍या मृत्‍यू

स्‍वतः रक्‍तदान करत वाचविले

अशा अवस्थेत त्यांना प्रसूती कळाही सुरू झाल्या. डॉ. सूर्यवंशी यांनी तातडीने जळगाव येथून प्लेटलेटची बॅग मागवली. महिलेचा एबी पॉझिटिव असा दुर्मिळ रक्तगट असल्याने व मध्यरात्री या गटाचे रक्त मिळणे शक्य नव्हते. डॉ. सूर्यवंशी यांचा रक्तगट एबी पॉझिटिव्ह असल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न करता माता व बालकाचे प्राण वाचविण्यासाठी स्वतः रक्तदान केले. ते रक्त स्विटी खरे यांना दिले. त्यामुळे त्यांची प्रसूती झाली. त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला.

मातेसह बाळ ठणठणीत

माता व बालकाची प्रकृती ठणठणीत असून, डॉ. वैभव सूर्यवंशी यांच्या सहकार्याचे व दातृत्वाचे कौतुक होत आहे. खरे कुटुंबीयांसाठी डॉ. सूर्यवंशी खऱ्या अर्थाने देवरूपी मानव ठरले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com