Jalgaon: रक्षाबंधनाला घेण्यासाठी आलेल्या भावास दिसला बहिणीचा मृतदेह

रक्षाबंधनाला घेण्यासाठी आलेल्या भावास दिसला बहिणीचा मृतदेह
Jalgaon Pachora News
Jalgaon Pachora NewsSaam tv

पाचोरा (जळगाव) : रक्षाबंधनासाठी बहिणीला घेण्यासाठी आलेल्या भावास बहिणीचा गळफास घेतलेला मृतदेह दिसला. हे दृश्‍य पाहून भावाने हंबरडा फोडत बहिणीची आत्महत्या (Suicide) नसून सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप केला व सासरच्यांना कठोर शिक्षेची मागणी हुंदके देत केली. (Jalgaon Pachora Crime News)

Jalgaon Pachora News
Beed: आधार द्या म्हणत शेतकरी रडला ढसाढसा; पाण्यातील पिक पाहून काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

भोपाळ (मध्य प्रदेश) येथील प्रिया देव (वय २६) हिचा विवाह पाचोरा (Pachora) येथील गणपतीनगरातील रहिवासी व एमएसएफ सेवेत कार्यरत असलेले विनोद सुरवाडे यांच्याशी गेल्या ३० ऑगस्ट २०२१ ला झाला होता. विवाहानंतर (Marriage) दोघांमध्ये किरकोळ कारणावरून अनेकदा खटके उडत होते. त्याबाबत प्रियाने आपल्या माहेरच्यांना कल्पना दिली होती. विनोद व प्रिया यांच्यात रविवारी (ता. ७) सकाळपासूनच भांडण सुरू झाले. याबाबत प्रियाने आपली बहिण दीपाली हिला मोबाईलवरून कल्पना दिली. दीपालीने आपल्या भावासही तसे कळवले.

भाऊ पोहचला अन्‌

भाऊ देवेन देव त्याने येत्या दोन, तीन दिवसांवर रक्षाबंधन आहे, त्यासाठी प्रियाला घेऊन येऊ व तिच्या पतीसह सासरच्या समजवू, असा विचार केला. देवेन देव आपले मेहुणे शशांक शेजवाल यांना घेऊन रविवारी (ता. ७) रात्री पाचोरा येण्यास निघाले. आम्ही येत आहोत, असे त्याने बहीण प्रियालाही कळवले होते. देवेन व शशांक हे दोघे आज (ता. ८) पहाटे पाचोरा येथे पोहोचले. याच वेळी विनोदची मामी प्रियाला उठवण्यासाठी गेली असता प्रिया गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांना दिसली. याच वेळी मृत प्रियाचे भाऊ व मेहुणे हे घरी पोहोचले. बहिणीला घेण्यासाठी आलो आणि तिचा मृतदेह पाहायला मिळाला हे पाहून भाऊ देवेन याने हंबरडा फोडला व बहीण आत्महत्या करूच शकत नाही, तिची हत्या झाल्याचा आरोप करत त्याने चौकशी व कारवाईची मागणी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com