पंतप्रधान मोदींना टपालातून पाठविल्‍या गोवऱ्या; इंधन दरवाढीविरोधात महिलांचे आंदोलन

पंतप्रधान मोदींना टपालातून पाठविल्‍या गोवऱ्या; इंधन दरवाढीविरोधात महिलांचे आंदोलन
पंतप्रधान मोदींना टपालातून पाठविल्‍या गोवऱ्या; इंधन दरवाढीविरोधात महिलांचे आंदोलन
Gas Price Hike

पाचोरा (जळगाव) : सातत्‍याने वाढत असलेले इंधन दरवाढी विरोधात आंदोलन पुकारले जात आहे. यात गॅसचे दर आणखी वाढल्‍याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्‍या गोवऱ्या भेट म्‍हणून पाठविण्यात आल्‍या. टपाल खात्‍यातून पार्सलद्वारे हे पाठविण्यात आले. (jalgaon-news-pachora-Gowarya-sent-to-PM-Modi-by-post-pachora-ncp-Women's-agitation-against-fuel-price-hike)

पाचोरा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्यावतीने केंद्र सरकारच्या घरगुती गॅस व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. टपाल ऑफिससमोर घोषणा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोवऱ्यांचे पार्सल आहेर म्हणून पाठविण्यात येऊन ते टपाल कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष रेखा देवरे, शहराध्यक्ष सुनीता देवरे यांच्या उपस्थितीत आघाडीच्या सदस्य महिलांनी केंद्र सरकारच्या गॅस व इंधन दरवाढीविरोधात टपाल कार्यालयासमोर घोषणाबाजी केली.

Gas Price Hike
दीड वर्षानंतर मध्यप्रदेशात महाराष्ट्राची लालपरी रवाना

पार्सल दिले टपाल कार्यालयात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गोवऱ्यांचे पार्सल आहेर म्हणून पाठविण्यात आले व ते कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आले. या वेळी केंद्र सरकारविरुद्धच्या घोषणांनी परिसर दणाणला. या आंदोलनात जिल्हा प्रवक्त्या प्रा. मंगला शिंदे, रेखा देवरे, सुनीता देवरे, अनिता देवरे, आशा जोगी, शीतल पाटील, कल्पना पाटील, सविता महाले आदी महिला सहभागी झाल्या.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com