आत्महत्येचे स्टेटस ठेवले अन्‌ युवकाने संपविले जीवन

आत्महत्येचे स्टेटस ठेवले अन्‌ युवकाने संपविले जीवन
आत्महत्येचे स्टेटस ठेवले अन्‌ युवकाने संपविले जीवन
SuicideSaam tv

पाचोरा (जळगाव) : म्हसास (ता. पाचोरा) येथील युवकाने आपल्या मोबाईलमध्ये आत्महत्येबाबतचे व्हॉट्सअप स्टेटस लावून गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना शुक्रवारी घडली. (jalgaon news pachora Suicide status and life ended by young man)

Suicide
अब्‍दुल सत्‍तार म्हणतात ‘तो’ व्हिडीओ बनावट; विरोधकांकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न

म्‍हसास येथील कैलास पाटील (वय २९) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आत्महत्येसंदर्भातील स्टेटस आपल्या मोबाईलमधील (Whatsapp) व्हॉट्सअपवर लावले व लगेचच गावालगत असलेल्या काकांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. नातलग व मित्रांनी स्टेटस पाहून त्याची शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना आढळला.

आत्‍महत्‍येची कारण अस्‍पष्‍ट

त्यास ग्रामीण रुग्णालयात (Hospital) आणले असता डॉ. अमित साळुंके यांनी त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला. मृत कैलास पाटील यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण कळले नाही. पाचोरा (Pachora) पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून शून्य क्रमांकाने पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात हे प्रकरण वर्ग केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.