व्‍हॉटस्‌ॲपवर व्‍हीडीओ धडकताच घरच्‍यांना सुखद धक्‍का; १४ वर्षांची प्रतीक्षा संपली

व्‍हॉटस्‌ॲपवर व्‍हीडीओ धडकताच घरच्‍यांना सुखद धक्‍का; १४ वर्षांची प्रतिक्षा संपली
Jalgoan News
Jalgoan NewsSaam tv

जळगाव : 14 वर्षापासुन घरातील तरूण बेपत्ता झाला. त्‍याची सर्वदूर शोधाशोध केली. घरच्‍या लोकांनी बरेच प्रयत्न करूनही शोध लागला नाही. यात कोरोना (Corona) सारखे संकट आले. यामुळे घरच्‍या मंडळींनी आशा सोडल्‍या व सर्वकाही देवावर सोडून दिले. परंतु, अचानक सोशल मिडीया (Social Media) व्‍हॉटस्‌ॲपवर व्‍हीडीओ धडकला अन्‌ परिवाराच्‍या आनंदाचा पारावार उरला नाही. (jalgaon news pachora the family as soon as the video hits on WhatsApp)

Jalgoan News
कारखान्याला ऊस न गेल्याने शेतकऱ्याचा जलसमाधी घेण्याचा प्रयत्न

पाचोरा (Pachora) येथील तरुण सुनिल भोई (रा. आठवडे बाजार पाचोरा) हा गेल्या 14 वर्षापासुन बेपत्ता होता. घरच्‍या लोकांनी बरेच प्रयत्न करूनही सापडेना. शेवटी घरच्या लोकांनी देवावर सोडुन दिले. ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे कोरोना काळातही काहीच झाले नाही. त्याला तमिळनाडूतील एका गावात जे मिळेल ते खाऊन पिवून जीवन जगत असतांना देवाने कोणा एकाला देवदुत म्हणुन पाठविले आणि त्या देवदुताने त्याची विचारणा करीत चक्क त्याचा व्हीडीओ बनवत व्हॉटसॲपवर अपलोड केला. त्याचा नातेवाईकांपर्यत हा व्हीडीओ पोहचवण्याची विनवणी केली.

तमिळनाडूतून आणत गावात काढली मिरवणूक

बघता बघता तो व्हीडीओ पाचोऱ्यात धडकला आणि घरच्या लोकांचा आनंद गगनाला म्हावेनासा झाला. मग काही जण मिळुन सुनील यास घेण्यासाठी तमिळनाडूत (Tamilnadu) पोहचले. तेथुन त्याला ताब्यात घेत प्लेनने मुंबईला आणले. तद्‌नंतर पाचोर येथे आणत चक्क घोड्यावरून डिजेच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील सर्व नागरीकांनी सहभाग घेत एकच जल्लोष साजरा केला. कालपर्यत जो खाण्यापिण्यासाठी वणवण फिरत होता. त्याची आज घोड्यावरून डिजेच्या तालात मिरवणुक व विमानाची सफर हे त्याच्यासाठी स्वप्नापेक्षा ही सुंदर होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com