एलपीजी गॅसचा काळाबाजार; टँकर डेपोवर न नेता परस्पर गॅसची विल्हेवाट

एलपीजी गॅसचा काळाबाजार; टँकर डेपोवर न नेता परस्पर गॅसची विल्हेवाट
एलपीजी गॅसचा काळाबाजार; टँकर डेपोवर न नेता परस्पर गॅसची विल्हेवाट
एलपीजी गॅस

जळगाव : पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारात पंजाबी ढाब्यामागे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक यांच्या विशेष पथकाने छापा टाकून एलपीजी गॅसचा काळाबाजार उघड केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांसह गॅस टँकर, सिलिंडर असा २६ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. (jalgaon-news-parola-Black-market-of-LPG-gas-Mutual-gas-disposal-without-taking-to-tanker-depot)

एलपीजी गॅस
विवाह काही दिवसांवर अन्‌ एकुलत्‍या एक मुलाचा मृत्‍यू

नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक बी. जी. शेखर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने म्हसवे फाट्याजवळील हॉटेलच्या पाठीमागे छापा टाकला. त्यात संशयित मूळ मालक खंडू पाटील (वय ४८, रा. म्हसवे), ओमनीचालक शिवाजी पाटील (वय ३३, रा. रथगल्ली, पारोळा), गॅस टँकरचालक दर्शनसिंग जोगिंदरसिंग (वय ४८, मोमनवळ, गुरुदासपूर, पंजाब), प्रकाश पाटील (फरार), युवराज पाटील (फरार) (दोन्ही रा. मोघन, ता. जि. धुळे) हे एलपीजी गॅसची काळ्या बाजारात विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी २६ लाख २५ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

असा होता साठा

यात १५ लाख रुपये किमतीचे हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे (१४ टायरचे) एलपीजी गॅसने भरलेले टँकर (एमएच ४३, वाय ५९३३) व त्यात ११ लाख २५ हजार २१० रुपये किमतीचा १७ हजार ३१० किलो गॅस भरलेला बिल्टीप्रमाणे घटनास्थळावर आढळून आला. तसेच एक लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची मारुती ओमनी (एमएच १९, वाय १७४५) व्हॅन घटनास्थळावर आढळून आली तर भारत गॅस कंपनीचे कमर्शिअल वापराचे ७ हजार ८०० रुपये किमतीचे १५ सिलिंडर १४.२ किलो वजनाचे गॅसने भरलेले, त्यापैकी ६ हजार ६०० रुपये किमतीचे ११ सिलिंडर गॅसने पूर्ण भरलेले प्रत्येकी किंमत ६०० प्रमाणे व गॅसने अर्धवट भरलेले प्रत्येकी किमत ३०० प्रमाणे घटनास्थळावर चार सिलिंडर ओमनी (एमएच १९, वाय १७४५) व्हॅनमध्ये आढळून आले. तसेच २२०० किलोचे एचपी कंपनीचे कमर्शिअल वापराचे एकूण १०५ सिलिंडर १४.२ किलो वजनाचे गॅसने भरलेले, त्यापैकी १८०० रुपये किलोचे ३ सिलिंडर गॅसने पूर्ण भरलेले प्रत्येकी किंमत ६०० प्रमाणे व ४०० रुपये किलोचे दोन सिलिंडर रिकामे प्रत्येकी किमत २०० प्रमाणे घटनास्थळावर व्हॅनमध्ये (एमएच १९, वाय १७४५) आढळून आले. तसेच कॅप्सूल टँकरमधून गॅस काढण्याचे कीट, इलेक्ट्रीक मोटर, प्रेशर मोजण्यासाठी असलेले मीटर, केमिकलने भरलेले ड्रम, प्लास्टिकच्या नळ्या, नरसाळे , तसेच डांबर असा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे.

असा उलगडला गुन्हा

म्हसवे शिवारात फाट्यासमोरील पंजाबी ढाब्याच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास खंडू पाटील, शिवाजी पाटील, दर्शनसिंग जोगिंदरसिंग या तिघांचा संगनमताने गॅसच्या काळाबाजाराचा गोरखधंदा सुरू होता. सुरत येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीमधून टँकर डिलेव्हरीसाठी कंपनीने नेमून दिलेल्या डेपोवर घेऊन न जाता चालकाने त्यातील काही गॅसची परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी उद्देशाने टँकरमधून बेकायदेशीररीत्या गॅस सिलिंडर भरण्याचे साहित्य व साधने वापरून या टँकरमधून सिलिंडरमध्ये गॅसची चोरी करून करताना आढळून आले. तसेच प्रकाश हिंमत पाटील (फरार), युवराज हिंमत पाटील हे डांबर वाहतूक करणारे टँकरचालकांशी संगनमत करून त्या वाहनातून डांबराची चोरी करण्याच्या उद्देशाने तापविण्यासाठी डांबराचे टँकर तेथे आणले होते.

Related Stories

No stories found.