बोरी नदीत केमिकल मिश्रीत पाणी; आंघोळीला गेलेल्‍या नागरीकांच्‍या अंगाला लागले अन्‌

बोरी नदीत केमिकल मिश्रीत पाणी; आंघोळीला गेलेल्‍या नागरीकांच्‍या अंगाला लागले अन्‌

बोरी नदीत केमिकल मिश्रीत पाणी; आंघोळीला गेलेल्‍या नागरीकांच्‍या अंगाला लागले अन्‌

पारोळा (जळगाव) ः बहादरपूर (ता. पारोळा) येथील बोरी नदी पात्रात आज (ता.10) सकाळी बरेच जण आंघोळीला गेले असता त्यांच्या अंगाला केमिकल लटकले. सदर बाब त्यांनी गावात सांगितल्‍यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी जावुन पाहणी केली असता नदीपात्रात केमिकल पाण्यात मिश्रीत झाले. याबाबत त्यांनी बहादरपूर तलाठी यांना बोलावून सदर बाब लक्षात आणून दिली. (jalgaon-news-parola-bori-river-water-cemical-mix)

बोरी नदीपात्रात सकाळी अक्षरशा केमिकलयुक्त पाणी वाहत होते. सकाळी आंघोळीला गेले त्यांच्या अंगाला पूर्ण केमिकल लटकले. त्यामुळे अंगाला खाजवू लागले. नेमकं हे केमिकल कोणी टाकले. नदीपात्रात का सोडले याबाबत ग्रामस्थांना प्रश्ने पडलीत. याबाबत प्रशासनाकडुन याबाबत माहिती घेणे सुरु आहे. अज्ञातांनी सोडलेले हे रसायन मुक्या प्राण्यांना तसेच व्यक्तींना देखील धोक्याचे असल्याचे यावेळी निदर्शनास आले. नेमके हे केमिकल आहे; की नॅशनल हायवे क्रमांक सहावर विकले जाणारे बोगस डिझेल आहे, अशी चर्चा सध्या गावात जोरदार सुरू आहे.

मुक्या प्राण्यांनाही धोका

प्रसंगावधान साधून शिरसोदेचे सरपंच बापू सैंदाणे यांनी बहादरपूर सजाचे तलाठी प्रवीण शिंदे यांना तात्काळ भ्रमणध्वनीवरून बोरी नदीपात्रात बोलावले. त्यांनी पाहिले की बोरी नदी पात्रात केमिकलयुक्त पाणी वाहत आहे. त्यांनी तहसीलदार अनिल गावंदे यांना सांगितले. सदर बाबतीत सखोल चौकशी होऊन दोषींना योग्य कारवाई करावी; अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली. मुक्या प्राण्यांना देखील या केमिकलमुळे धोका होऊ शकतो. म्हणून या आज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध लावावा त्यांना त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

बोगस बायोडिझेल?

बोरी नदीपात्रात सदर रसायन केमिकल नसुन नॅशनल हायवे क्रमांक 6 वर विकले जाणारे बोगस बायोडिझेल आहे. त्यांनी रात्री हा प्रकार केला असावा असा गावकर्यांनी अंदाज बांधला आहे. ट्रॅक्टरच्या टँकरद्वारे बोगस बायोडिझेलची विक्री हॉटेलवर होत होती. त्यांनी रात्री बोगस डिझेल नदीपात्रात सोडले असावे; असा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com