धक्‍कादायक..आईसमोरच मुलीला पाजले विष; पैशांच्या वादातून घटना
विष

धक्‍कादायक..आईसमोरच मुलीला पाजले विष; पैशांच्या वादातून घटना

धक्‍कादायक..आईसमोरच मुलीला पाजले विष; पैशांच्या वादातून घटना

पारोळा (जळगाव) : पैशाच्या वादातून २८ वर्षीय विवाहितेला मारहाण करत जबरदस्तीने आईसमोर विष पाजून तिचा खून केल्याची घटना बुधवारी (ता. १३) सकाळी नऊला धरणगाव रस्त्याजवळील एका शेतात घडली. (jalgaon-news-parola-poisoned-girl-in-front-of-mother-Incidents-from-money-disputes)

पारोळा शहरातील राजीव गांधीनगर परिसरातील रहिवासी उषाबाई प्रकाश खाडे बुधवारी सकाळी नऊला आपली विवाहित मुलगी पूजा संदीप शिंदे हिच्यासोबत शेतात काम करीत होत्या. अचानक झोडगे येथील संशयित पंकज हिलाल चौधरी हा दुचाकीने शेतात आला. त्याने माझे पंधरा हजार रुपये द्यावे, अशी मागणी करत पूजाला मारहाण केली. पती त्रास देत असल्याने ती दोन वर्षांपासून माहेरी आली असून, मी कोणतेही पैसे घेतले नाही, पती किंवा सासरे यांनी पैसे घेतले असतील, असे पूजाने त्याला सांगितले. मात्र, संशयित चौधरीने काहीही ऐकून न घेता पूजाचा गळा दाबला, तसेच जवळचे पडलेले विषारी औषध तिला पाजले. पूजाच्या आईसमोरच ही घटना घडली. पूजाची आई उषाबाई खाडे यांनी विरोध केला. त्यांच्यात झटापटी झाली. मात्र, त्यांना ढकलून दिले.

विष
पोलिसांची दिखाव्याची छोटेखानी कारवाई; तंबाखूजन्य पान मसालाची सर्रास वाहतूक

संशयिताने आणले रुग्णालयात

दरम्यान, घटनेनंतर संशयित पंकज चौधरी घाबरला. त्याने पूजाला दुचाकीवर बसवून पारोळा कुटीर रुग्णालयात आणले. त्यानंतर संशयित पसार झाला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करीत आहे.

Related Stories

No stories found.