जळगावात ५४ रूपये पेट्रोल; मनसेचा उपक्रम पंधरा मिनिटाच संपला

जळगावात ५४ रूपये पेट्रोल; मनसेचा उपक्रम पंधरा मिनिटाच संपला
जळगावात ५४ रूपये पेट्रोल; मनसेचा उपक्रम पंधरा मिनिटाच संपला
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. यात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असताना महागाईला दिलासा देण्यासाठी (MNS) मनसेतर्फे 54 रुपये लिटर पेट्रोलचे वाटप करण्याचा उपक्रम राबविला. परंतु, हा उपक्रम त्‍यांच्‍यासाठी मनस्‍ताप ठरला. मोजक्‍याच लोकांना स्‍वस्‍तातील पेट्रोल (Petrol) मिळाले अन्‌ पंधरा मिनिटातच उपक्रम आटोपता घेतला. (jalgaon news Petrol at Rs 54 in Jalgaon MNS activity ended in fifteen minutes)

Jalgaon News
Hingoli: चुलत बहिण भावाची गळफास घेत आत्महत्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव मनसे कार्यकर्त्यांतर्फे स्वस्त पेट्रोल उपक्रम राबविला. ५४ रूपयात पेट्रोलची माहिती नागरीकांना समजली अन्‌ जळगावातील (Jalgaon News) पेट्रोल पंपावर नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. पेट्रोल पंप चालकाला देखील ही गर्दी थोपवणे कठीण झाले होते. यामुळे पेट्रोल पंपच बंद केला.

नागरीकांचा झाला हिरमोड

मनसेने राबविलेला हा उपक्रम काही वेळातच बंद करावा लागला. ५४ लिटर पेट्रोल मिळविण्यासाठी पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या. यात ढकला ढकल होत असल्‍याने स्वस्त पेट्रोल विक्री बंद झाल्याने रांगेतील नागरीकांचा हिरमोड झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com