Jalgaon News: धक्कादायक..एकमेकांना मिठी मारत पती– पत्‍नीसह मुलाने घेतले विषारी औषध; पतीचा मृत्यू

धक्कादायक..पती– पत्‍नीसह मुलाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न; पतीचा मृत्यू
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : वडली येथे एकाच कुटुंबातील तीन जणांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची (Jalgaon News) धक्कादायक घटना आज (६ एप्रिल) सकाळी घडली. यात पित्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मुलगा आणि आईची प्रकृती गंभीर असून दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) उपचार सुरू आहे. (Maharashtra News)

Jalgaon News
Mira Bhayandar News: केस बारीक केल्याने १३ वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल; १६ व्या मजल्यावर बाथरूममध्ये गेला अन् ...

वडली (ता. जळगाव) गावात नारायण दंगल पाटील (वय ६६) हे पत्नी भारती पाटील (वय ५५) आणि मुलगा गणेश पाटील (वय ३३) यांच्यासोबत वास्‍तव्‍यास होते. गेल्या काही दिवसांपासून पाटील कुटुंबीय तणावात होते. यात आज (६ एप्रिल) सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान नारायण पाटील त्यांची पत्नी भारती पाटील आणि मुलगा गणेश पाटील यांनी तिघांनी घरात असतांना विषारी औषध सेवन केले.

Jalgaon News
Bajar Samiti Election: पारोळा बाजार समितीत माजी आमदारांचे दोन्‍ही नामांकन अवैध

मित्राला फोन करून बोलावले

अत्यवस्थ वाटू लागल्याने गणेशने गावातील मित्र श्यामला फोन करून घरी येण्याचे सांगितले. श्याम तेथे आल्यावर आई– वडीलांसह मुलगा गणेश हे तिघे गळ्यात गळा टाकलेल्या अवस्थेत आढळून आले. यानंतर तिघांना खासगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. नारायण पाटील यांचा उपचारादरम्यान सकाळी अकराच्‍या सुमारास मृत्यू झाला. तर पत्नी भारती आणि मुलगा गणेश या दोघांची प्रकृती गंभीर आहेत. तिघांनी अचानकपणे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com