वरणगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड; झटापटीत पोलिस जखमी

वरणगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड; झटापटीत पोलिस जखमी
वरणगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड; झटापटीत पोलिस जखमी

वरणगाव (जळगाव) : वरणगाव येथील पिंपळमळ्यात निर्जनस्थळी असलेल्‍या खळ्यात जुगाराचा अड्डा गेल्या अनेक वर्षांपासुन सुरू होता. याची माहिती जळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक यांना मिळाली होती. त्या अनुशंगाने जळगाव वाचक शाखेच्या पोलिस पथकाने शहरात अचानक धाड टाकुन जुगार खेळतांना सहा जणांना अटक केली. तर चाळीस ते पंन्नास जण पळून गेले आहेत. परंतु त्यांच्या ३५ ते ४० मोटार सायकली व ५ ते ६ फोर व्हीलर वाहनांची शुटींग छाप्यातील अधिकारींनी केली असली तरी गुन्ह्यामध्ये वाहने जप्तीचा उल्लेख केला नसून जप्त केलेली रक्कम सुद्धा अल्पप्रमाणात दाखविण्यात आली असल्याचे दिसुन आले आहे. मात्र कारवाई करीत असतांना आरोपींच्या झटापटीत एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. (jalgaon-news-Raid-on-gambling-den-at-Varangaon-Police-injured-in-the-scuffle)

जळगाव जिल्हा अवैध व्यवसायाचे माहेरघर बनले असल्याची तक्रार जळगाव स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍याकडे केली होती. जिल्‍ह्याचे पोलिस अधिक्षक व उपमुख्यमंत्री यांच्यात याबाबत चर्चा होऊन जळगाव जिल्ह्यात वरीष्ठांनी विविध पथके तयार करून धाड सत्र सुरू केल्याने अवैध व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहे.

निनावी फोनवरून तक्रार

वरणगाव येथुन पोलिस अधिक्षकांना निनावी भ्रमणध्वनीवरून वरणगाव येथे पिंपळमळ्यात जुगाराचा अड्डा गेल्या अनेक वर्षापासुन सुरु आहे. त्यात राजकारणी, उद्योगपती, समाजसेवकांसह शहरांतील व बाहेर शहरांतील जुगारी जुगार खेळण्यासाठी मोठी गर्दी करीत असल्याची माहिती मिळाली. त्याच अनुषंगाने वरीष्ठांनी पथकाची निर्मिती करून जळगाव वाचक शाखेचे पथक सहाय्यक पोलिस निरिक्षक सिध्देश्वर आखेगावकर, पीएसआय सुनील चौधरी, सहाय्यक फौजदार शांताराम वानखेडे, प्रविण पाटील, जमिल रवान, रविंद्र पाटील, आसिफ पिंजारी, भरत डोके या पथकाने वरणगाव शहरातील पिंपळमळा भागात जुगार खेळत असतांना मोठ्या शिताफिने धाड टाकली.

वरणगाव येथे जुगार अड्ड्यावर धाड; झटापटीत पोलिस जखमी
चिमुकलीने वडिलांना लटकलेले पाहिले अन्‌ रडत खाली आली

अन्‌ सारे सैरावैरा पळाले

पोलिसांची धाड पडताच जुगार खेळणारे जुगारी सैरावैरा पळू लागले होते. त्यावेळी छाप्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना झटापटीत जखमी देखील व्हावे लागले. पथकातील कर्मचाऱ्यांना सहा संशयीत जेरबंद करता आले. यात संशयीत आरोपी राजेंद्र बळीराम चौधरी, संतोष पाडूरंग इंगळे, हसन शेख कादर, शेख असलम शेख अकबर, मुकुंदा राजाराम इंगळे, पद्माकर गोपाळ पाटील (सर्व राहणार वरणगाव) यांना अटक करण्यात आली आहे. मात्र गुन्‍ह्याची नोंद सुरु असतांना पोलिसांनी जुगाराच्या छाप्यातून पळून गेलेल्यांनाच पंच व साक्षीदार म्हणुन घेतल्याची चर्चा सुरू आहे.

जिल्‍ह्यात कुठेही वरीष्ठांचे पथक काम करू शकते. परंतु कामाच्या व्यापामुळे एखाद कारवाई करणे राहुन जाते. तरी यापुढे मुक्ताईनगर पोलिस विभागात दररोज स्थानिक पोलिसांकडून धाडसत्र सुरू करून अवैध व्यवसाय पुर्णतः बंद केले जातील.

– विवेक लांवड, विभागीय पोलिस अधिकारी मुक्ताईनगर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com