चाळीसगावला जुगार अड्ड्यावर छापा; १८ जणांविरुद्ध गुन्हा

चाळीसगावला जुगार अड्ड्यावर छापा; १८ जणांविरुद्ध गुन्हा
चाळीसगावला जुगार अड्ड्यावर छापा; १८ जणांविरुद्ध गुन्हा
Crime NewsSaam tv

चाळीसगाव (जळगाव) : येथील करगाव रस्त्यावरील इच्छापूर्ती मंदिराजवळील एका हॉटेलच्यामागे अवैधरीत्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर नाशिकच्या विशेष पथकाने मध्यरात्री छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून (Chalisgaon) त्यांच्याकडून सव्वा लाखांच्या रोकडसह एकूण ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. (jalgaon news Raid on gambling den in Chalisgaon)

Crime News
धुळ्यातील मुस्लिम धर्मगुरूंनी भोंग्यांबाबत घेतला सकारात्मक निर्णय

जिल्ह्यात सुरु असलेले अवैध धंदे आटोक्यात आणण्यात आणण्यासाठी (Nashik) नाशिकच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. शहरातील करगाव रस्त्यावरील इच्छापूर्ती मंदिराजवळच्या रुबाबदार हॉटेलच्या मागे पत्त्यांच्या जुगाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती (Police) पोलिस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाला. त्यानुसार, पथकाने रात्री एकच्या सुमारास संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला असता, १८ जण पत्त्यांचा जुगार खेळताना मिळून आले.

३ लाख ७१ जाराचा मुद्देमाल जप्‍त

त्यांच्याकडून १ लाख ३३ हजार ६२० रुपये रोख, दोन ५२ पत्त्यांचे कॅट, १२ हजार ५०० रुपये किमतीचे ११ मोबाईल व सुमारे सव्वा दोन लाखांच्या ११ मोटारसायकल असा एकूण ३ लाख ७१ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पोलिस हवालदार सचिन धारणकर यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील गुलाब राजपूत (५६), सोमनाथ जाधव (३५), विशाल महाजन (२९), शंकर सोनार (५२), कुणाल पाटील (३३), सोनू गवळी (३६), राहुल चौधरी (२८), अजय भावसार (३३), कपिल पाटील (३४), आबा चौधरी (३३), हिंमत चौधरी (३८), भोजराज सावळे (२३) या बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून फरार झालेल्या भय्या सूर्यवंशी, गंपू शेख, संजू घटी, सोनू उर्फ म्हश्या जाधव, महेश राजपूत व बापू मराठे (सर्व रा. चाळीसगाव) यांचा पोलिस शोध घेत आहेत. ही कारवाई नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी जी. शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्यासह त्यांच्या पथकातील रामचंद्र बोरसे, सचिन धारणकर, शेख अहमद, मनोज दुसाने, प्रमोद मंडलीक, कुणाल मराठे व मुकेश टांगोरे यांनी केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com