Railway: साखळी ओढणाऱ्या १८०० जणांवर रेल्‍वेची कारवाई; १३ लाखाचा दंड वसुल

साखळी ओढणाऱ्या १८०० जणांवर रेल्‍वेची कारवाई; १३ लाखाचा दंड वसुल
Jalgaon Railway News
Jalgaon Railway NewsSaam tv

जळगाव : धावत्‍या रेल्‍वेची काही कारण नसताना साखळी ओढून थांबविले जाते. यामुळे रेल्‍वे व प्रवाशांचा देखील खोळंबा होत असतो. रेल्‍वेकडून (Railway) याबाबत सुचना असताना देखील अनेकजण साखळी ओढत असतात. अशा १८०० जणांवर रेल्‍वे प्रशासनाने कारवाई केली आहे. इतकेच नाही तर (Jalgaon) त्‍यांच्‍याकडून सुमारे १३ लाख रूपयांचा दंड देखील वसुल केला आहे. (Jalgaon Bhusawal Railway News)

Jalgaon Railway News
Jalgaon: जिल्ह्यात पुढील तीन दिवस ‘येलो अलर्ट’

रेल्‍वे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत असताना देखील अनेक प्रवासी कुठलेही कारण नसताना विनाकारण साखळी ओढत असतात. प्रामुख्‍याने एक्स्प्रेस गाड्यांना थांबा नसलेल्‍या गावांच्या ठिकाणी साखळी ओढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. यावर अंकूश घालण्यासाठी रेल्‍वे प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.

भुसावळ विभागात १३ लाखाचा दंड

रेल्‍वे प्रशासनाच्‍या भुसावळ (Bhusawal) विभागाने मागील आठ महिन्यांत १८०० जणांवर कारवाई केली आहे. रेल्वे गाडीत सुरक्षेसाठी असलेले रेल्वे सुरक्षा बलचे जवान ज्या डब्यातून साखळी ओढण्यात आली आहे. त्या डब्याकडे तत्काळ जात ज्या प्रवाशाने साखळी ओढली त्या प्रवाशाला ताब्यात घेतात. त्याला जवळच्या रेल्वे पोलीस ठाण्याकडे सुपुर्द करतात. यानंतर त्‍यांच्‍याकडन एक हजार रुपयांचा दंड वसुल केला जातो. मागील आठ महिन्‍यात भुसावळ विभागात १८०० प्रवाशांकडून १३ लाख ९ हजार २४५ रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

हे कारण असल्‍यास ओढू शकतात साखळी

रेल्वे प्रवासात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्‍यास; अर्थात रेल्वे प्रवासात प्रवाशाची प्रकृती बिघडल्यास, गाडीत काही वाद झाल्यास किंवा स्टेशनवरून गाडी सुटल्यानंतर एखादा प्रवासी खाली राहून गेल्यास रेल्वे गाडीची साखळी ओढण्याचे सूचित करण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com