बाप्‍पाच्‍या स्‍वागताला पावसाच्‍या सरी..ढोल ताशे नाही तरी जल्‍लोष

बाप्‍पाच्‍या स्‍वागताला पावसाच्‍या सरी..ढोल ताशे नाही तरी जल्‍लोष

बाप्‍पाच्‍या स्‍वागताला पावसाच्‍या सरी..ढोल ताशे नाही तरी जल्‍लोष

जळगाव : गणपती बाप्पा मोरया....च्या गजरात आज शहरासह जिल्ह्यात श्री गणेशाचे स्वागत करण्यात आले. घरगुती, सार्वजनिक गणेश मंडळात आज श्रींच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. बाप्‍पाचे आगमनाच्‍यावेळी पावसाने देखील जोरदार हजेरी लावली. यामुळे उत्‍साह द्विगुणीक झाला होता. सलग दुसऱ्या वर्षी ‘ना ढोल..ना ताशे...ना वाद्यांचा गजर, ना मिरवणूका...’ तरीही जल्लोष व भक्तीमय वातावरण अनुभवण्यास मिळाले. (jalgaon-news-rain-come-in-ganesh-swagat-ganesh-festival)

श्रीगणेश मुर्तीसह पुजेच्या साहित्यांची दुकाने आज टॉवरचौक परिसर ते गांधी मार्केट, सुभाष चौक परिसर, उपनगरातील कालिकामाता चौक, अजिंठा चौफुली, गणेश कॉलनी, महाबळ कॉलनी, शिवकॉलनी, पिंप्राळा आदी परिसरात थाटण्यात आली होती. मिरवणूकीवर बंदी असल्याने गणेश मंडळांनी आपापल्या सजविलेल्या वाहनांतून जल्लोषात श्री गणेशाची मुर्ती नेली. मुर्तीची उंची चार फुटापेक्षा लहान असल्याची सक्ती असल्याने सर्वच मुर्ती या आकारात मात्र आकर्षक रंगसंगीत व विविध आकारातील विक्रीस हेात्या. अनेक ठिकाणी नागरिकांनी शाडू मातीपासून बनविलेल्या मुर्ती खरेदीवर भर दिला.

बाप्‍पाच्‍या स्‍वागताला पावसाच्‍या सरी..ढोल ताशे नाही तरी जल्‍लोष
धक्कादायक..एकाच कुटूंबातील तीन अल्पवयीन मुलींना पळविले

ऑनलाईन दर्शनाची सक्ती

गणेशोत्सव काळात भावीकांना दर्शनासाठी ऑनलाईन पध्दतीनेच दर्शन घेवू द्यावे. मंडप येवून श्रीगणेशाचे मुखदर्शन किंवा मंडपात येवून दर्शन घेण्यास प्रतिबिंध करण्यात येत असून दर्शन ऑनलाइन पध्दतीने देण्यात यावे, अशा सूचना शासनाचे असून त्याचे पालन करण्याची जबाबदारी महापालिका, पोलिस, स्थानीक प्रशासनाने करावे अशा सूचना अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com