जळगाव जिल्‍ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस

जळगाव जिल्‍ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस
जळगाव जिल्‍ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस
Rain Alert

जळगाव : आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतल्‍यानंतर पुन्‍हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यातील काही भागात शनिवार व रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (jalgaon-news-Rain-with-strong-winds-for-two-days-in-Jalgaon-district)

सतत मुसळधार पाऊस झाल्‍याने शेतीतील बहुतांश कामे रखडली आहे. कापूस वेचणीच्‍या कामाला आता सुरवात झाल्‍यानंतर पुन्‍हा पावसाची अंदाज वर्तविल्‍याने बळीराजा चिंतेत पडला आहे. यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील शेतमालाची काढणी व शेतात साठवून ठेवलेला शेतमाल सुस्थितीत योग्य ठिकाणी ठेवावा. जेणेकरुन होणाऱ्या वादळी वारा, अवकाळी पावसापासून शेतमालाचे संरक्षण होईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

Rain Alert
म्‍हणून शाहरुख खानच्या मुलाला अडकवले : अनिल गोटेंचा भाजपवर निशाणा

शेतकरी हवालदील अन्‌ आता पुन्‍हा संकट

जळगाव जिल्ह्यात यंदा अनेकदा अतिवृष्टी झाली. यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिक काळवंडली तसेच शेतात पाणी साचले, नदी, नाल्याला आलेल्या पुरात काठावरील शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाची शक्यता वर्तवल्याने शेतऱ्यांनी आपल्या पिकांची व शेतमालाची काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले आहे.

Related Stories

No stories found.