विवाह होवून काही दिवसातच नववधूचा मृत्‍यू; तीन आठवड्यांचाच झाला संसार

विवाह होवून काही दिवसातच नववधूचा मृत्‍यू; तीन आठवड्यांचाच झाला संसार
विवाह होवून काही दिवसातच नववधूचा मृत्‍यू; तीन आठवड्यांचाच झाला संसार
Jalgaon NewsSaam tv

रावेर (जळगाव) : धुमधडाक्‍यात विवाह झाल्‍यानंतर काही दिवसातच दुःखाचा डोंगर कोसळला. विवाहाला तीन आठवडे होत नाही तोच मेंदूतील रक्तस्त्रावाने (ब्रेन हॅमरेज) नववधूचे निधन झाल्याची दुःखद घटना येथे घडली. याबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (jalgaon news raver death of the bride within a few days of the marriage)

Jalgaon News
दुचाकी दगडावर आदळल्‍याने तरुणाचा जागीच मृत्‍यू

रावेर (Raver) येथील रहिवासी असलेल्या अंकुश सावदेकर (रा. वाणीगल्ली, रावेर) हे यावल (Yawal) येथील न्यायालयात नोकरीला आहेत. १७ एप्रिलला त्यांचा विवाह (Marriage) नशिराबाद येथील दिलीप वाणी यांची कन्या गौरी यांच्याशी संपन्न झाला. विवाहानंतर पती- पत्नी वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनालाही गेले. मात्र ३० एप्रिलला गौरीच्या मेंदूत रक्तस्राव झाला आणि ब्रेन हॅमरेजमुळे तिचा उजवा हात आणि पाय निकामी झाला.

शर्थीचे प्रयत्‍न पडले अपुर्ण

जळगाव (Jalgaon) येथे उपचारानंतर गौरीला मुंबई येथील नायर इस्पितळात हलविण्यात आले. भक्कम आर्थिक स्थिती नसतानाही अंकुश यांनी उपचाराचे आणि पत्नीला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. काही समाज बांधवांनीही त्यांना मदत केली. परंतु गुरूवारी (५ मे) मध्यरात्री त्यांचे मुंबईत इस्पितळात निधन झाले.

तीन आठवड्यांचा संसार

अंकुश सावदेकर यांचे वडील त्यांच्या लहानपणीच वारले असून त्यांच्या आई येथील अंगणवाडीत सेविका म्हणून काम करतात. जेमतेम आर्थिक स्थिती असताना विवाहानंतर अवघ्या ३ आठवड्यातच दुर्देवी घटना घडल्याने येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईहून रात्री उशिरा त्यांचे पार्थिव रावेर येथे आणण्यात येऊन शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.