असाही प्रामाणिकपणा..चुकून बँक खात्यात आलेले नऊ लाख केले परत

असाही प्रामाणिकपणा..चुकून बँक खात्यात आलेले नऊ लाख केले परत
Jalgaon
JalgaonSaam tv

रावेर (जळगाव) : आपल्या बँक खात्यावर जळगावमधील बियाणे विक्रेत्याचे चुकून आलेले ९ लाख रुपयांचे पेमेंट तालुक्यातील वाघाडी येथील युवा शेतकऱ्याने प्रामाणिकपणे सोमवारी (ता. ११) परत केले. येथील येस बँकेच्या (Bank) शाखेत या युवकाने त्याच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने आलेले ९ लाख रुपये ऑनलाइन पद्धतीनेच पुन्हा मुळ मालकाच्या नावावर ट्रान्स्फर केले. त्याच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. (jalgaon news raver Nine lakhs returned to the bank account by mistake)

Jalgaon
इंस्टाग्रामवर मैत्री करून अत्‍याचार

रावेर (Raver) तालुक्यातील वाघाडी येथील विजय पाटील (वय ३४) हे शेती करतात. जळगाव (Jalgaon) येथील बी. जे. मार्केटमध्ये कार्यालय असलेल्या अग्रवाल ऍग्रो एजन्सीच्या खात्यातून विजय पाटील यांच्या खात्यावर ऑनलाइन पद्धतीने चुकून ९ लाख रुपये ट्रान्स्फर झाले. अर्थात विजय पाटील यांना त्याची माहिती नव्हती. पैसे चुकून दुसऱ्या खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे लक्षात येताच अग्रवाल ऍग्रो एजन्सीचे संचालक जितेंद्र अग्रवाल यांनी माहिती घेऊन विजय पाटील यांना दूरध्वनी करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. या वेळी विजय पाटील यांनी अजिबात विचार न करता प्रामाणिकपणे त्यांना हे चुकून आलेले ९ लाख रुपये परत करण्याचा शब्द दिला.

बँकेत जावून तात्‍काळ रक्‍कम परत

विजय पाटील यांनी सोमवारी शहरातील बँकेच्या शाखेत जाऊन तेथील शाखा व्यवस्थापक जितेंद्र यादव आणि सहाय्यक शाखा व्यवस्थापक धनराज पाटील यांची भेट घेऊन खात्यावर ९ लाख रुपये आल्याची खात्री करून घेतली. ताबडतोब ९ लाख रुपये पुन्हा अग्रवाल ऍग्रो एजन्सीच्या नावावर ट्रान्स्फर करण्याचे पत्र व आवश्यक त्या स्लीप भरून बँकेत दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com