केळी वाहतूकीतून रेल्‍वे कोट्याधीश; पाच महिन्‍यात मिळाले १८ कोटी

केळीची वाहतूकीतून रेल्‍वे कोट्याधीश; पाच महिन्‍यात मिळाले १८ कोटी
केळी वाहतूकीतून रेल्‍वे कोट्याधीश; पाच महिन्‍यात मिळाले १८ कोटी
Banana Transport

जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील दोन रेल्वे स्थानकांमधून नवी दिल्ली येथे केळीची वाहतूक झाली. मागील पाच महिन्यात रेल्वे वॅगन्सद्वारे १ लाख टनांपेक्षा जास्त केळी वाहतूक करण्यात आली असून यातून रेल्वेला तब्बल १८ कोटी रुपयांपेक्षाही जास्त उत्पन्न भाड्यापोटी मिळाले आहे. (jalgaon-news-raver-Railway-billionaire-from-banana-transport-18-crore-in-five-months)

जळगाव जिल्‍ह्यातील रावेर तालुक्‍यात केळीचे उत्‍पादन मोठ्या प्रमाणात होत असते. देशातील विविध राज्‍यांसह परदेशात देखील केळीची वाहतूक केली जात असते. यातून रेल्‍वे देखील चांगले उत्‍पन्‍न मिळत आहे. आता रेल्वेने पंजाब, जम्मू आणि नवी मुंबईसाठी देखील किसान रॅक सुरु करावा; अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. रेल्वेने मोठ्या प्रमाणावर केळी वाहतूक झाल्यामुळे यावर्षी केळीचे भावही बऱ्यापैकी टिकून राहिल्याचे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

केळी कामगारांना मोठा रोजगार

रावेर रेल्वे स्थानकावरून केळी वाहतूक थोडीशी उशिरा सुरू झाली. येथून व्हीपीयु व जीएस प्रकारच्या वॅगन्समधून ४२ रॅक केळी वाहतूक झाली. या दोन्ही रेल्वेस्थानकांवर शेकडो केळी कामगारांना मोठा रोजगारही मिळाला.

Banana Transport
जळगावात नवा प्रयोग..करवंदाची शेती फुलवली अन्‌ लाखो रूपयांचे उत्‍पन्‍न

केळीचे भावही टिकून

रेल्‍वेच्‍या वाहतुकीतून सुमारे १६ हजार टन केळी वाहतुकीतून रेल्वेला सुमारे २ कोटी ७५ लाख रुपये भाड्यापोटी मिळाले आहेत. या दोन्ही रेल्वे स्थानकातून गेल्या ५ महिन्यात १ लाख १० हजार टन केळी वाहतूक झाली. यातून रेल्वेला १८ कोटी ७६ लाख ९५ हजार रुपये भाड्यापोटी मिळाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर केळी वाहतूक झाल्याने येथील केळीचा पुरवठा कमी होऊन यावर्षी केळीचे भावही बर्‍यापैकी टिकून राहिले आहेत. तसेच डिझेलच्या भावात वाढ होऊनही ट्रकच्या दिल्ली भाड्यात वाढ झालेली नाही.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com