रॉकेल मिश्रीत बायोडिझेलची विक्री; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्‍यात

रॉकेल मिश्रीत बायोडिझेलची विक्री; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्‍यात
रॉकेल मिश्रीत बायोडिझेलची विक्री; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्‍यात

रावेर (जळगाव) : अवैधरित्या रॉकेल मिश्रीत बायोडिझेलचा अवैध साठा करुन चालते फिरते बायोडिझेलचे पंप तयार केला. अँपेरिक्षा वाहनावर बायोडिझेल हे नावाजलेले कंपनीची डिझेल प्रमाणेच असल्‍याचे भासवून जनतेच्या विश्वासघात करुन शासनाची व वाहतुकदार जनतेची फसवणुक केली. ही बाब उघड झाल्‍यानंतर रावेर पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून रॉकेल, बायोडिझेलसह ३ लाख ६७ हजार रुपये किंमतीचे साहित्य पोलीसांनी जप्त केले. (jalgaon-news-raver-Sales-of-kerosene-blended-biodiesel-The-police-took-both-of-them-into-custody)

रावेर पोलीसांना बऱ्हाणपुर रोडवरील गोपी ट्रान्सपोर्ट अँण्ड तोल काटा समोर तसेच फकीर वाडा भागात पाताळगंगा रोडवर आरोपी पत्री शेडमध्ये (गोडाऊन) बायोडिझेलमध्ये रॉकेल मिक्‍स करून अवैधरित्या रॉकेल मिश्रीत अवैध साठा करून विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. दोन्ही ठिकाणी अवैधरित्या रॉकेल मिश्रीत बायोडिझेलचा अवैध साठा करुन चालते फिरते बायोडिझेलचे पंप ॲपे रिक्षा वाहनावर तयार केले. बायोडिझेल हे नावाजलेले कंपनीच्‍या डिझेल प्रमाणेच अल्‍याचे भासवुन विक्री करत होते. वाहतुकदार जनतेची फसवणुक केली असल्याची खात्री झाल्याने शे. शरीफ शे. मुस्लिम (वय ३८), शे. फिरोज शे. मुस्लिम (वय २७) दोन्ही रा. तिरुपतीनगर रावेर हे अवैधरित्या विक्री व साठवणुक करतांना आढळून आले.

असे आढळून आले साहित्‍य

२ हजार ७०५ लिटर रॉकेल मिश्रीत बायोडिझेल व साधनासह एकुण रुपये ३ लाख ६७ हजार २६० रुपयाचे मालासह मिळुन आले. यात २ लाख ४० हजार ९०० रुपये किंमतीचा माल त्यात एक ७० हजार रुपये किंमतीची लाल रंगाची अँपे रिक्षा, ९० हजार रुपयाची एक बायोडिझेल विक्री करण्याचे पंप मशिन, १२ हजार रुपये किंमतीची एक बॅटरी, ६८ हजार ४०० रुपयाचे ९५० लिटर राँकेल मिश्रीत बायोडिझेल, एक हजार लिटर मापाची प्लॅस्टीकची टाकी, ५०० रुपये किंमतीचे एक बायो डिझेल लिहीलेले बोर्ड, १ लाख २६ हजार ३६० रुपये किंमतीच्या ७ प्लास्टिकच्या २ लोखंडी २०० लिटर मापाच्या टाक्या पैकी ८ टाक्या पुर्ण भरलेल्या एक टाकी अर्धी भरलेली, एक ३५ लिटर, एक २० लिटर मापाची पुर्ण भरलेली असे एकुण १७५५ लिटर राँकेल मिश्रीत बायो डिझेल रावेर पोलिसांनी जप्त केले आहे.

रॉकेल मिश्रीत बायोडिझेलची विक्री; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्‍यात
आदिवासी विकास मंत्र्यांचा जिल्‍हाच खावटीपासून भुकेला; कुटुंबापर्यंत पोहचला नाही लाभ

दोघांना अटक

सदरची कारवाई डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, एपीआय शितलकुमार नाईक, पीएसआय मनोहर जाधव, पीएसआय मनोज वाघमारे, नंदू महाजन, महेंद्र सुरवाडे, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, प्रमोद पाटील आदींनी कारवाई केली. याबाबत पुरवठा निरीक्षक रावेर तहसील वाकोजी नागरगोजे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com