जामनेरात विक्रम.. एकाच दिवशी १२ हजार नागरिकांचे लसीकरण

जामनेरात विक्रम.. एकाच दिवशी १२ हजार नागरिकांचे लसीकरण
जामनेरात विक्रम.. एकाच दिवशी १२ हजार नागरिकांचे लसीकरण
Corona vaccination

जळगाव : कोरोना लसीकरणाचा दररोज वेगवेगळा विक्रम साधला जात आहे. जिल्‍ह्यातच नव्‍हे तर राज्‍यात विक्रमी लसीकरण होत आहे. त्‍यानुसार जामनेर तालुक्यात देखील एकाच दिवशी बारा हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. (jalgaon-news-Record-in-Jamner-taluka-Vaccination-of-12-thousand-citizens-in-a-single-day)

माजी मंत्री तथा जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या सहकार्याने लसीकरण मोहीम राबवण्यात आली. जामनेर तालुक्यात शनिवारी जामनेर उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, सात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.

Corona vaccination
दीड वर्षानंतर मध्यप्रदेशात महाराष्ट्राची लालपरी रवाना

दोन दिवसात २० हजाराचा टप्‍पा

अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचा संकल्प आमदार गिरीश महाजन यांनी केला. त्यासाठी जास्तीत जास्त साठा मिळवून तालुक्यात लसीकरण शिबिर घेतले. त्यासाठी नगरपालिकेसह स्वयंसेवकांची मदत घेऊन नियोजन केले. दोन दिवसांपूर्वी प्रथमच साडेसात हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. त्याच धर्तीवर राबवलेल्या शिबिरामध्ये लसीकरण करण्यात प्रथमच साडेसात शनिवारी सुक्ष्म नियोजन करून १२ नागरिकांचे लसीकरण व्यवस्था धर्तीवर करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com