जुने धारागीर परिसरात आढळली महादेवाची पिंडी, मंदिराचे अवशेष

जुने धारागीर परिसरात आढळली महादेवाची पिंडी, मंदिराचे अवशेष
महादेवाची पिंडी
महादेवाची पिंडी

एरंडोल (जळगाव) : अंजनी प्रकल्पात बुडीत झालेल्या जुने धारागीर परिसरातील भगतवाडीशेजारी असलेल्या वीज वितरण (Mahavitaran) कंपनीच्या सबस्टेशनजवळ खोदकाम करीत असताना जमिनीखाली महादेवाची पुरातन पिंडी आणि मंदिराचे खांब सापडले. याबाबत माहिती मिळताच हे अवशेष बघण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. (jalgaon-news-Remains-of-Mahadev-pindi-temple-found-in-old-Dharagir-area)

महादेवाची पिंडी
खडसे– महाजन आले समोरासमोर; एकमेकांवर आरोपांच्‍या फैरींची जुगलबंदी

कासोदा रस्त्यावरील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या मागील बाजूने नांदखुर्द गावापर्यंतच्या रस्त्यावर सध्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. रस्ताकामासाठी लागणारा मुरूम काढण्यासाठी खोदकाम सुरू असताना जमिनीखाली पुरातन महादेवाची पिंडी आणि मंदिराचा खांब सापडला. ही माहिती परिसरात ग्रामस्थांना समजताच त्या ठिकाणी मोठी गर्दी उसळली.

दत्‍त मंदिरात आणून विधिवत पूजा

रस्ताकामाचे ठेकेदार हेमंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप वाघ यांना याबाबत माहिती दिली. श्री. वाघ यांनी नंतर उज्ज्वल पाटील, सचिन पाटील, जे.सी.बी.चालक कैलास कुंभार व ग्रामस्थांच्या सहकार्याने पिंडी आणि खांब वनकोठा येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात श्रीदत्त मंदिरात आणून विधिवत पूजा केली. ही पिंडी व खांब सध्या या मंदिरात ठेवली असून, भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. तहसीलदार सुचिता चव्हाण यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान, या परिसरात आणखी मंदिराचे अवशेष सापडण्याची शक्यता असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com