अंगणातील खड्ड्यात विद्युत प्रवाह; महिलेचा जागीच मृत्‍यू

अंगणातील खड्ड्यात विद्युत प्रवाह; महिलेचा जागीच मृत्‍यू
अंगणातील खड्ड्यात विद्युत प्रवाह; महिलेचा जागीच मृत्‍यू

जळगाव : शहरातील बिलाल चौक येथील ५० वर्षीय महिलेचा विजेच्‍या धक्‍क्‍याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. पाऊस पडल्‍याने बाहेर पाणी होते. कपडे सुकवायला गेल्‍यानंतर बाहेर पडलेल्‍या विद्युत तारेला स्‍पर्श होवून महिलेचा मृत्‍यू झाला. (jalgaon-news-road-main-electric-supply-current-women-death)

जळगाव शहरातील तांबापूरा परिसर असलेल्‍या बिलाल चौकातील रहिवासी जिन्नताबी हुसेन शेख (वय ५०) असे मृत झालेल्‍या महिलेचे नाव आहे. जिन्नताबी हुसेन शेख ह्या आज दुपारी कपडे सुकवण्यासाठी अंगणात आल्या. यावेळी अंगणातील खड्ड्यात विद्युत तार पडलेली होती. त्‍यांचे लक्ष नसल्‍याने त्यांच्या पाय त्या खड्ड्यातील पाण्यात पडला. यात त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

अंगणातील खड्ड्यात विद्युत प्रवाह; महिलेचा जागीच मृत्‍यू
जळगाव जिल्‍ह्याला दिलासा..आणखी एक तालुका कोरोनामुक्त

पाऊस पडल्‍याने सावधान

पावसाळ्याच्‍या दिवसात प्रामुख्‍याने विजेचा धक्‍का लागण्याच्‍या घटना अधिक घडत असतात. पाऊस पडल्‍यानंतर ओल्‍या जागेतच अनेकदा पाणी भरताना मोटरचा करंट लागून मृत्‍यू होण्याच्‍या घटना देखील घडल्‍या आहेत. यामुळे पावसाळ्याच्‍या दिवसात सावधानता बाळगणे महत्‍त्‍वाचे ठरते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com