पंढरपूरात मुक्ताबाईने केली नगरपरिक्रमा; मठात पाच दिवस मुक्काम

पंढरपूरात मुक्ताबाईने केली नगरपरिक्रमा; पंढरपूर मठात पाच दिवस मुक्काम
पंढरपूरात मुक्ताबाईने केली नगरपरिक्रमा; मठात पाच दिवस मुक्काम

मुक्ताईनगर (जळगाव) : मुक्ताईनगर येथून निघालेल्‍या मानाचा संत मुक्ताबाई पालखी सोहळा वाखरी येथील सकळ संतांच्‍या भेटीनंतर वीस तास प्रवास करत रात्री १ वाजता मठात दाखल झाली. आषाढी एकादशीनिमित्त नगर परिक्रमा करण्यात आली. (jalgaon-news-sant-muktabai-palkhi-pandharpur-nagarparikrama)

संत मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी- मुक्ताईनगर येथून निघालेली मुक्ताई पालखी वाखरी तळावर आपल्या भावंडांचे सकळ संतांचा भेट सोहळा झाला. वाखरीतुन फक्त दोन भाविकांना पायी चालण्यास दिलेली परवानगी दहाही दिंडी चालकांना मान्य नव्हती; यावर प्रशासनाशी चर्चा करण्यात बराच वेळ गेला अखेर तीस वारकरी ईसवाबी पासून पायी चालण्यास परवानगी मिळाली. पंढरपूरात मुक्ताबाई मठात पोहचण्यास रात्रीचा १ वाजला होता.

पाच दिवस मुक्‍काम

पाच दिवस मुक्काम मठातच राहील. येथेच दैनंदिन कीर्तन प्रवचन भजन आदी नित्योपचार पार पडत आहे. आषाढी एकादशी निमित्त नगर परिक्रमा करण्यात आली. सकाळी ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे व दुपारी ह.भ.प.संदिप महाराज खामणीकर यांचे कीर्तन झाले. एकादशीपासून पांडुरंगास नैवेद्यासाठी परवानगी असून फराळाचा पहिला नैवैद्य सम्राट पाटील व श्रध्दा पाटील यांनी दिला.

पंढरपूरात मुक्ताबाईने केली नगरपरिक्रमा; मठात पाच दिवस मुक्काम
नंदुरबारमध्‍ये विठ्ठल मंदिर बंद..भाविकांनी घेतले बाहेरूनच दर्शन

चंद्रभागा स्नानास भाविक वंचित

आषाढी एकादशी दिवशी चंद्रभागेच्या स्नानास अनन्य साधारण महत्त्व आहे. परंतु प्रशासनाने ऐनवेळी चंद्रभागा स्नान नाकारल्याने नगरपरिक्रमेवरच समाधान मानावे लागले. उद्या (ता.२१) पादूका स्नानास परवानगी मिळाली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com