भावी पतीदेखत मुलीला नेले पळवून; एकतर्फी प्रेमातून प्रेमविरासह कुटुंबियांचा प्रताप

भावी पतीदेखत मुलीला नेले पळवून; एकतर्फी प्रेमातून प्रेमविरासह कुटुंबियांचा प्रताप
भावी पतीदेखत मुलीला नेले पळवून; एकतर्फी प्रेमातून प्रेमविरासह कुटुंबियांचा प्रताप

यावल (जळगाव) : अल्पवयीन मुलीचे लग्न ठरलेले असतांना आपले त्या मुलीवर प्रेम आहे; असे सांगत एकतर्फी प्रेमातून कथीत प्रेमवीराने कुटुंबियांच्या सहकार्याने मुलीस पळवून नेले. पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिल्यानंतर आठ दिवसांनी त्या मुलीचा शोध घेऊन तिला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आले. (jalgaon-news-satpuda-aria-husband-also-took-the-girl-away-The-glory-of-a-family-with-a-one-sided-love)

यावल पोलिस ठाण्यात संबंधित प्रेमवीरासह त्याच्या कुटुंबियांविरुद्ध पोस्को कायद्यासह अन्‍य कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. आदिवासी कुटुंबात हा प्रकार घडला आहे. सातपुडा पर्वतरांगात असलेल्या गाडऱ्या- जामन्या येथील अल्पवयीन मुलीचे लग्न वाघाझिरा (ता. यावल) येथील रवी हुकाऱ्या बारेला याचेसोबत ठरले. याच मुलीवर नितेश जागीराम बारेला (रा. पलासकोट, ता. भगवानपुरा, जि. खरगोन, हल्ली मु. गाडऱ्या, ता. यावल) याचे एकतर्फी प्रेम होते.

भावी पतीसोबत होती मुलगी तेव्‍हा..

सदर मुलीचे लग्न ठरल्यानंतर नितेशने आपल्या कुटुंबियांना संबंधीत मुलीवर प्रेम करतो व तिच्याशीच लग्न करणार असे सांगितले. दरम्यान १२ जुलैस दुपारी सदर मुलगी तिचा चुलत भाऊ गणदास खुशाल बारेला व रवी हुकऱ्या बारेला यांच्यासोबत दुचाकीवरून लंगडा आंबामार्गे वाघझिरा येथे जात होते. दरम्यान रस्त्यातच नितेश व त्याचे वडील जागीराम बारेला यांच्‍यासह नरसिंग बारेला, अनेरसिंग बारेला, शांताराम बारेला व मन्साराम बारेला (रा. बालपाणी, ता. भगवानपुरा,जि. खरगोन,मध्य प्रदेश) यांनी त्यांना अडवत नितेश बारेला याने त्या अल्पवयीन मुलीचा हात धरून मी तुझ्याशी प्रेम करतो, तु माझ्याबरोबर चल; अन्यथा तुला जिवे ठार मारेल अशी धमकी दिली.

भावी पतीदेखत मुलीला नेले पळवून; एकतर्फी प्रेमातून प्रेमविरासह कुटुंबियांचा प्रताप
हातावरची मेहंदीही पुसली नाही; लग्‍नाच्‍या दहाव्‍याच दिवशी नवविवाहितेची आत्‍महत्‍या

मारहाण करत मुलीला नेले उचलून

मुलीचा चुलत भाऊ गणदास खुशाल बारेला आणि तिचा भावी पति रवी बारेला यांना मारहाण करून जबरदस्तीने त्या मुलीस उचलून हे मध्यप्रदेशमध्ये घेऊन गेले. यासंदर्भात येथील पोलिसात तक्रार देण्यात आली. आठ दिवसानंतर २० जुलैस मध्यप्रदेशातील भगवान पुरा पोलीस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने या पीडित मुलीस यावल पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री तिच्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात तिला जबरदस्ती पळवून नेणाऱ्या नितेश बारेला, जागीराम बारेला, नरसिंग बारेला, अनेरसिंग बारेला, शांताराम बारेला व मन्साराम बारेला या सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com