सातपुडा निवासी मनुमाता..अष्‍ठमीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी

सातपुडा निवासी मनुमाता..अष्‍ठमीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सातपुडा निवासी मनुमाता..अष्‍ठमीला दर्शनासाठी भाविकांची गर्दी
मनुमाता

जळगाव : जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या रांगामध्ये श्री मनुदेवीचे स्थान असून खानदेशाची कुलस्वामिनी म्हणून श्री मनुदेवीची ओळख आहे. त्यामुळे निसर्गरम्य परिसरात वसलेल्‍या मनुमातेच्‍या दर्शनासाठी नवरात्र उत्सवानिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. (jalgaon-news-Satpuda-Manumata-temple-Crowd-of-devotees-to-pay-homage-to-Ashtami)

अश्विन चैत्र नवरात्र निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची मनूदेवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने यावर्षी राज्य सरकारने घटस्थापनेपासून मंदिर खुली केल्याने राज्य सरकारने दिलेल्या नियमानुसार श्री मनुदेवी मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी दर्शनाची सोय केली आहे.

मध्‍यप्रदेश, गुजरातमधून भाविक दर्शनासाठी

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आडगाव परिसरातील सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये वसलेली आदीशक्ती श्री मनुदेवीची इ.स. १३ व्या दशकात स्थापना येथील गवळी राजाने केल्‍याचा उल्लेख आढळतो. मनुदेवीच्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या दोन मुर्त्यां आहेत. त्यातील एक मनुदेवीची तर दुसरी मूर्ती रेणुका मातेची आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गरम्य परिसरात श्री मनुदेवीचे मंदिर असून इथे भाविकांची मोठी गर्दी होते. नवरात्रोत्सव काळात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात येथूनही भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.

मनुमाता
गुजराती पदार्थ म्हणून ओळखला जाणारा पात्रा महाराष्‍ट्रातील नवापूरचा..ज्‍याची परदेशी खवय्यांना भुरळ

अशी आहे आख्‍यायिका

शंकर– पार्वती सारीपाट खेळत असतांना सारीपाटात जो कोणी हारेल तो सातपुडा पर्वतावर थांबेल असे ठरले आणि त्यावेळी सारीपाटात पार्वती हरल्याने पार्वतीला सातपुडा पर्वतावर थांबवे लागले. मात्र सातपुडा पर्वतावर थांबून मी काय करणार असा प्रश्न पार्वतीने महादेवाला केला. त्यावेळी महादेवाने मनातील इच्छा पूर्ण करणारे तुझे रूप याठिकाणी वसणार असून तुझ्या चरणी आलेल्या भक्तांच्या मनोकामना तू पूर्ण करणारी असल्याने म्हणून मनुदेवी नावाने सुप्रसिद्ध होणार अशी मनुदेवीची आख्यायिका आहे.

एक नदी सात वेळा करावी लागते पार

श्री मनुदेवीचे मंदिर हे हेमाडपंथी असून कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या समोर १४० फुटाचा मोठा धबधबा आहे. या धबधब्यातून जी नदी वाहते ती नदी डोंगराच्या खालून जे भाविक येतात त्यांना सात वेळा पार करत मंदिरापर्यंत पोहोचता येते. त्यामुळे भाविकांना देखील इथले निसर्गरम्य वातावरण आकर्षित करते.

Related Stories

No stories found.