मांजात अडकलेल्‍या घुबडाला जीवदान; मध्‍यरात्री तीन तास रेस्क्यु ऑपरेशन

मांजात अडकलेल्‍या घुबडाला जीवदान; मध्‍यरात्री तीन तास रेस्क्यु ऑपरेशन
मांजात अडकलेल्‍या घुबडाला जीवदान; मध्‍यरात्री तीन तास रेस्क्यु ऑपरेशन
Owlsaam tv

जळगाव : झाडाच्या फांद्यांमध्‍ये पतंगाच्‍या मांजामध्ये घुबड अडकले होते. त्याला वाचविण्यासाठी महापालिकेची यंत्रणा आणि वन्यजीव संस्थेचे सदस्यांनी जीवदान दिले. मध्‍यरात्रीच्‍या दरम्‍यान तब्बल तीन तासाच्या रेस्क्यु ऑपरेशन करत घुबडाला वाचविण्यात यश आले. घुबडाला वाचविण्यासाठी रात्रभर संपूर्ण यंत्रणा शर्थीचे प्रयत्न झाले. शृंगी घुबडाला (Owl) सागर पहेलवान यांच्या सतर्कतेमुळे महापालिका, वन्यजीव संरक्षण संस्थेचे पक्षीमित्र यांच्या टीमवर्कमुळे वाचविणे शक्य झाले. (jalgaon news Save the life of the owl trapped in the cat)

Owl
Nandurbar: जिल्‍हाधिकारींची अचानक पाहणी; यंत्रणांची उडाली दमछाक

जळगाव (Jalgaon) शहरातील वाल्मीकनगर परिसरातील सागर पहेलवान हे रेल्वे (Railway) कर्मचारी वन्यजीव प्रेमी आहेत. त्यांच्या घरासमोर गेल्या सात ते आठ वर्षांपासून पिंपळ आहे. शृंगी घुबड नेहमी त्यावर बसलेले असते. सोमवारी मध्यरात्रीदेखील त्यांनी घुबडाला पाहण्यासाठी झाडावर पाहिले असता झाडावर फडफड जाणवली. बारीक टॉर्चच्या प्रकाशात ते घुबड पतंगाच्या मांजात अडकून जगण्याचा संघर्ष करत असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ वन्यजीव संरक्षण संस्थेचे योगेश गालफाडे यांना कळविले.

अन्‌ सुरू झाले रेस्‍क्‍यू ऑपरेशन

वन्‍यजीव संस्थेचे पक्षीमित्र बाळकृष्ण देवरे यांच्याशी चर्चा केल्‍यावर त्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. महापालिकेच्या (Jalgaon Corporation)अग्निशमन विभागाचे फायरमन देवीदास सुरवाडे, वसंत कोळी, परमेश्वर सोनवणे यांनी फायर ऑफिसर शशिकांत बारी यांचे मार्गदर्शन घेत सहमती दर्शविली. पथक घटनास्थळी दाखल झाले. घुबडाला वाचविण्यासाठी ‘रेस्क्यू ऑपरेशन’ सुरू झाले. जमिनीपासून सुमारे ४० फूट उंचीवर हे घुबड अडकलेले होते. विद्युत वाहन यायला वेळ लागत असल्याने आणि सकाळपर्यंत घुबड वाचण्याची शक्यता नव्हती; म्हणून विविध कोनातून प्रयत्न करत फायर फायटरची शिडी उभी केली. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शिबिरात उपलब्ध संसाधनांचा वापर करत सुरक्षित रेस्क्यूचे प्रशिक्षण कामी आले.

अशी झाली सुटका

सुमारे दीड तास हा फक्त शिडी उभारण्यात गेला. समांतर हाय होल्टेज विद्युत तार असल्याने त्यालाही स्पर्श व्हायला नको होता. अंधार असल्याने लांब बीम असलेल्या प्रखर टॉर्चची आवश्यकता होती. ती जवळ नव्हती म्हणून अमन गुजर यांना कॉल करण्यात आला. त्यानंतर दहा मिनिटांत टॉर्चची उपलब्धता झाली. अनेक वेळा प्रयत्न केल्यावर घुबडाच्या पायात अडकलेला मांजा तोडण्यात यश आले. घुबडाने भरारी घेत समोरच्या बिल्डिंगवर विसावा घेतला आणि सहज उद्‌गार निघाले ‘पोरांचा पतंग खेळ जोरात रंगला अन्‌ अंधाऱ्या रात्री जीव झाडाले टांगला. त्याले वाचविण्यासाठी पक्षीमित्र धावला’.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com