Jalgaon: शाळा सुरू पण वर्ग रिकामेच; उशिराच्या आदेशाने संभ्रम

शाळा सुरू पण वर्ग रिकामेच; उशिराच्या आदेशाने संभ्रम
jalgaon
jalgaonsaam tv

जळगाव : कोरोनाची तिसरी लाट आल्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आजपासून शहरी भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असून शहरातील शाळा सुरू मात्र वर्ग रिकामे असल्याचे चित्र आहे. मुळात शाळा (School) सुरू करण्याबाबत उशीराने आदेश आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. (jalgaon news School starts but classroom is empty Confusion with late order)

jalgaon
Crime News: विश्रामबाग पोलिसांनी ६३ लाखांसह अलिशान कार केली जप्त; चाैघांची चाैकशी सुरु

राज्य सरकारच्या सूचनेनुसार जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात शहरी भागात आजपासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरु करण्यास जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी मान्यता दिली आहे. तशा सूचना सर्व गट शिक्षणाधिकारी, जळगाव महापालिकेचा शिक्षण विभाग, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळा सुरु झाल्या.

विद्यार्थीच आलेच नाही

कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सुरुवातीला ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या. यानंतर आजपासून शहरी भागातील शाळा सुरु झाल्या आहेत. परंतु आज जळगाव शहरातील कोणत्याही शाळेत विद्यार्थी दिसून आले नाहीत. एक- दोन शाळेत बोटावर मोजन्याइतकेच विद्यार्थी पाहण्यास मिळाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com