जळगाव जिल्‍ह्यातील शाळा, महाविद्यालये मंगळवारपासून होणार सुरू

जळगाव जिल्‍ह्यातील शाळा, महाविद्यालये मंगळवारपासून होणार सुरू
School
School

जळगाव : जिल्ह्यात डेल्टा प्लसचे निर्बंध शिथील झाल्यानंतर सर्व बाजारपेठा रात्री आठपर्यंत सुरू आहेत. सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. आता इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा व अकरावी ते पदवीपर्यंतची महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. येत्या मंगळवार (ता. १७)पासून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या नियम पाळून शाळा, महाविद्यालये सुरू होतील. (jalgaon-news-Schools-and-colleges-in-Jalgaon-district-will-start-from-Tuesday)

जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. आता शासनाने सर्व शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शाळा, महाविद्यालयांनी सूचना काढून विद्यार्थ्यांना नियमित क्लासेसला हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

School
आजीबाई करतेय कोळपणी, नांगरणी; कर्ता पुरूष नसल्‍याने ओढवली परिस्थिती

शाळा स्‍वच्‍छतेची मोहिम

बंदमुळे दीड वर्षापासून शाळा, महाविद्यालये धूळखात पडली होती. त्यातील स्वच्छता मोहीम आता हाती घेण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी शाळा, महाविद्यालयांना स्वच्छतेबाबत पत्र दिले आहे. सोबतच विद्यार्थ्यांना किती लांब अंतरावर बसवावे, काय काय काळजी घ्यावी, आदी मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. त्यादृष्टीने शाळा, महाविद्यालय प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com