मुख्‍यमंत्री उध्दव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेनेची जळगावात रॅली

मुख्‍यमंत्री उध्दव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेनेची जळगावात रॅली
Shiv Sena News, Political Crisis in Maharashtra, Jalgaon Latest Marathi News
Shiv Sena News, Political Crisis in Maharashtra, Jalgaon Latest Marathi NewsSaam tv

जळगाव : उध्दव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत जळगाव शहरात शिवसेनेतर्फे रॅली काढण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदेसह सर्व आमदार शिवसेनेत (Shiv Sena) परत येतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (jalgaon news Shiv Sena rally in support of CM Uddhav Thackeray)

Shiv Sena News, Political Crisis in Maharashtra, Jalgaon Latest Marathi News
मला प्रभारी मुख्यमंत्री करा; बीडच्या तरुणाची राज्यपालांकडे अनोखी मागणी

जळगाव येथील (Jalgaon) शिवसेनेच्या गोलाणी संकुलातील कार्यालयापासून ही रॅली काढण्यात आली. जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, महापौर जयश्री महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. (Jalgaon Latest Marathi News)

कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

रॅलीच्या अग्रभागी उध्दव ठाकरे यांची प्रतिमा कार्यकर्त्यांच्या हातात होती. शिवसेना जिंदाबाद, उध्दव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत ही रॅली टॉवर चौकात गेली. त्या ठिकाणी रॅली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com