गाव तिथे शिवरस्ता या योजनेवर भर देणार : गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटीलगुलाबराव पाटील

गाव तिथे शिवरस्ता या योजनेवर भर देणार : गुलाबराव पाटील

गाव तिथे शिवरस्ता या योजनेवर भर देणार : गुलाबराव पाटील

जळगाव : कोणत्याही गावातील रस्त्यांप्रमाणेच शिवारात जाणारे रस्तेदेखील महत्वाचे असतात; कारण यावरून शेतकरी ये- जा करतात. आता यापुढे आपण गाव तिथे शिवरस्ता ही मोहिम राबवणार असून याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले. (jalgaon-news-shiv-sena-sampark-abhiyan-gulabrao-patil-farmer-start-shiv-rasta-yojana-n-village)

जळगाव तालुक्यातील विदगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याच्या जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे अध्यक्षस्थानी होते. तालुक्यातील विदगाव येथे आज शिवसेनेचा मेळावा आयोजीत करण्यात आला. यात शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत नोंदणी करण्यात आली. याप्रसंगी पालकमंत्री पाटील म्हणाले, की प्रत्येक गावातील रस्याबाबत लोकप्रतिनिधी जागरूक असतात. रस्ते व्हावे यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. मात्र शेतकरी ज्या रस्त्यावरून नेहमी ये- जा करतात त्या रस्त्यांबाबत कुणी जागरूक नसते. याचीच दखल घेत गाव तिथे शिवरस्ता ही योजना अंमलात आणली जाणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

गुलाबराव पाटील
विठू नामाच्‍या गजरात संत मुक्‍ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्‍थान

माजी सैनिकांचा सत्कार

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने ममुराबाद- विदगाव परिसरातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या अभियानांतर्गत संघटनात्मक बांधणी, पक्ष बांधणी, बुथरचना बुथप्रमुख, गटप्रमुख, सह-गटप्रमुख यांच्या नियुक्त्या केल्या. पदाधिकार्‍यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, कोरोना मुक्त गाव याविषयी आढावा घेतला व या संदर्भात चर्चा केली. तसेच परिसरातील १८ सरपंच, उपसरपंच यांनी या अभियानात सहभाग नोंदवला. शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com