आपल्‍यातीलच आगपेट्या घेवून जाळ करण्याच्‍या प्रयत्‍नात : मंत्री गुलाबराव पाटील

पक्ष बांधणीसाठी संघटनेत नव्‍यांना संधी देणे गैर नाही. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करुन कामे केली तर निश्चितच संघटनेला बळकटी येईल.
आपल्‍यातीलच आगपेट्या घेवून जाळ करण्याच्‍या प्रयत्‍नात : मंत्री गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटीलगुलाबराव पाटील

पारोळा (जळगाव) : शिवसेनेत कोणतेही भांडण नसल्‍याबाबतचा खुलासा करित नियोजन मंडळाचा निधी देतांना कोणावरही अन्याय केलेला नाही. तरी देखील विरोधक व आपल्यातील काहीजण आगपेट्या घेवुन जाळ करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सारे दूर ठेवून एकजुटीने काम करा तरच संपर्क अभियान यशस्वी झाल्यासारखे होईल; अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. (jalgaon-news-shiv-sena-sampark-abhiyan-minister-gulabrao-patil-statment-leader)

मुख्‍यमंत्री उध्दव ठाकरे यांच्‍या वाढदिवसानिमित्ताने राज्यभर १२ ते २४ जुलै दरम्यान शिवसंपर्क अभियान राबविले जाणार आहे. त्या पाश्वभुमीवर एरंडोल, पाचोरा व चाळीसगाव मतदार संघाच्या शिवसेनेच्या विभागीय पदाधिकारी यांचे मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, विष्णु भंगाळे आदी हजर होते.

पाचही आमदारांनी एकजुट ठेवावी

पालकमंत्री पाटील यांनी जिल्‍ह्यात पुर्वी शिवसेना कशी वाढली. यासाठी कोणी योगदान दिले. याबाबत सांगुन वैचारिक मतभेद असतील; मात्र शिवसेनेत कोणतेही भांडणे नाहीत याचा खुलासा केला. (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांस जिव्हाळा लावून पक्षाची उभारणी केली. शाखा प्रमुख हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी संघटना वाढवली. पक्ष बांधणीसाठी संघटनेत नव्‍यांना संधी देणे गैर नाही. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करुन कामे केली तर निश्चितच संघटनेला बळकटी येईल. यासाठी जिल्‍ह्यातील पाचही आमदारांनी एकजुट ठेवावी, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

गुलाबराव पाटील
ग्रामसेवकाचा सही देण्यास नकार; भरती प्रक्रियेत अडचणी

महिला पदाधिकार्यांनी पुढे यावे : आमदार पाटील

पक्ष वाढीसाठी नवीन चेहरे महत्वाचे असले, तरी पक्षात महिला पदाधिकारींची संख्‍या वाढणे गरजेचे आहे. जिल्‍ह्यात शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या, जिल्हा परिषद सदस्या यांचे संख्‍याबळ जास्त आहे. मात्र त्या व्यासपीठावर येत नाही. यासाठी लोकप्रतिनिधींनी सुरुवात करुन महिला पदाधिकारींना स्थान द्यावे. आजवर अनेक गावात तेचते शाखा प्रमुख कागदावर आहेत. यात परिवर्तन होणे अपेक्षित असुन प्रत्यक्षदर्शी शाखा निर्माण करणे गरजेचे आहे.

संघटना बळकटीसाठी आत्मपरिक्षण महत्वाचे : आमदार चिमणराव पाटील

जिल्‍ह्यात एरंडोल, जळगाव ग्रामीण व पाचोरा मतदार संघ वगळला तर चाळीसगाव, अमळनेर, यावल, रावेर या भागात शिवसेना सक्षम करणेसाठी सर्वांना आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. सत्तेशिवाय शहाणपण नाही. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंतर्मुख होवुन पक्ष बांधणीसाठी कामाला लागावे. राजकारणात माझा बळी गेला, तर मात्र संघटनेला दाग लागु देणार नाही. संपर्क अभियानाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com