जळगाव आगाराचे सोळा कर्मचारी निलंबित

जळगाव आगाराचे सोळा कर्मचारी निलंबित
जळगाव आगाराचे सोळा कर्मचारी निलंबित
निलंबित

जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांचा संप सातव्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, कामावर येण्याचे आदेश देवूनही जळगाव आगारातील सोळा कर्मचारी कामावर रुजू न झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण कायम आहे. (jalgaon-news-Sixteen-st-employees-of-Jalgaon-depot-suspended)

तुटपुंज्या पगारावर परिवाराचा उदरनिर्वाह भागत नाही. महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन अदा करावे, शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये विलीनीकरण करून न्याय द्यावा; याप्रमुख मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी (ता. १३) एसटी महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या कुटुंबीयांनीही आंदोलन सुरू केले ते आजही सूरूच होते. आतापर्यंत जळगाव एसटी आगाराचे चौदा कोटींपेक्षा अधिकचे उत्पन्न बुडाले आहे.

निलंबित
बालकास ताेंडात पकडून बिबट्याने ठाेकली धूम; आईने केला पाठलाग

आंदोलनाला लोक संघर्ष मोर्चाने पाठिंबा दिला आहे. मोर्चाचे सचिन धांडे, पियुष पाटील, भरत कर्डिले, प्रमोद पाटील, कलिंदर तडवी, मुकेश सावकारे, दामोदर भारंबे, सागर पाटील, राहुल पावरा, अजय पावरा, असोदाचे चित्रनीश पाटील, सचिन माळी, सुमित साळुंखे, कानळदा सरपंच पुंडलिक सपकाळे, प्रमोद चव्हाण, किशोर सपकाळे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com