SSC Result : जळगाव जिल्‍ह्याचा ९९.९४ टक्‍के निकाल; तीन विद्यार्थी अनुत्‍तीर्ण

SSC Result : जळगाव जिल्‍ह्याचा ९९.९४ टक्‍के निकाल; तीन विद्यार्थी अनुत्‍तीर्ण

जळगाव जिल्‍ह्याचा ९९.९४ टक्‍के निकाल; तीन विद्यार्थी अनुत्‍तीर्ण

जळगाव : महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल आज जाहीर केला. यात जळगाव जिल्‍ह्याचा निकाल ९९.९४ टक्‍के लागला असून यात जवळपास सर्वच विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत. यामध्‍ये देखील मुलींचीच बाजी राहिल्‍याचे चित्र आहे.

महाराष्‍ट्र राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण महामंडळातर्फे दहावीच्‍या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु, कोरोना महामारीमुळे दहावीची परीक्षा रद्दचा निर्णय घेतला होता. वर्षभर वर्ग न भरता व परीक्षा न होताच निकाल लावल्‍याचा पहिलाच प्रसंग आहे. यातही निकाल कसा लागगार याची उत्‍सुकता होती. मात्र विद्याथ्‍र्यांच्‍या मुल्‍यांकन पद्धतीने निकाल जाहीर केला गेला असून जळगाव जिल्‍ह्याचा निकाल ९९.९४ टक्‍के लागला आहे.

SSC Result : जळगाव जिल्‍ह्याचा ९९.९४ टक्‍के निकाल; तीन विद्यार्थी अनुत्‍तीर्ण
युरीया खतासाठी शेतकऱ्यांच्या सकाळपासूनच रांगा; जाणवतोय खताचा तुटवडा

५८ हजार २४९ विद्यार्थी उत्‍तीर्ण

दहावीच्‍या परीक्षेसाठी जळगाव जिल्‍ह्यातून ५८ हजार २७९ विद्याथ्‍र्यांनी नोंदणी केली होती. या संपूर्ण विद्यार्थींचे मूल्‍यांकन करून बोर्डाकडे पाठविले होते. त्‍यानुसार आज लागलेल्‍या निकालात जिल्‍ह्यातील ५८ हजार २७९ विद्याथ्‍र्यांपैकी ५८ हजार २४९ विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत. तर ३० विद्यार्थी अनुत्‍तीर्ण झाले आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com