एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली कुलदेवतेची शपथ; जळगाव जिल्‍ह्यातही संप कायम

एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली कुलदेवतेची शपथ; जळगाव जिल्‍ह्यातही संप कायम
एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली कुलदेवतेची शपथ; जळगाव जिल्‍ह्यातही संप कायम
ST Strike

जळगाव : राज्यभरात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने (Maharashtra Goverment) बैठक घेत पगारवाढीचा प्रस्‍ताव सादर केला आहे. परंतु, हा निर्णय मान्‍य नसल्‍याने एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप कायम ठेवला आहे. यात जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा आगारातील (Chopda Depot) सर्व कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त करत कुलदेवता व परिवाराची शपथ घेत संप सुरूच ठेवला आहे.

ST Strike
एसटी बंदमुळे विद्यार्थ्यांचे हाल; खाजगी वाहनातून जीवघेणा प्रवास

राज्‍य सरकारने कालच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर केला; त्या निर्णयावर एसटी कर्मचारी समाधानी नाहीत. राज्य शासनात विलनीकरण झाल्याशिवाय संप मिटणार नसल्‍याची भुमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्‍यामुळे जळगाव विभागीय कार्यालयाच्‍या मध्‍यवर्ती बसस्‍थानकात देखील कर्मचारी आंदोलनात बसले आहेत. सलग १९ दिवसांपासून हा संप सुरू आहे.

चोपडा आगारात कुलदेवतेची शपथ

जोपर्यंत शासनात विलनीकरण होत नाही; तोपर्यंत कामावर जायचे नाही. तसेच संपावर ठाम राहण्याची भुमिका चोपडा आगारातील कर्मचार्यांनी घेतली. इतकेच नाही तर संप कायम ठेवत सर्व कर्मचाऱ्यांनी कुलदेवतेची व सहपरिवाराची जबाबदारी म्‍हणून शपथ घेत आपल्या भुमिकावर ठाम राहण्याचे ठरविले आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com