St Strike: एसटी कर्मचारी शासनाला देणार भीक; बसस्‍थानक आवारात भीक मांगो!

एसटी कर्मचारी शासनाला देणार भीक; बसस्‍थानक आवारात भीक मांगो!
St Strike
St Strikesaam tv

जळगाव : राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचे विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. आजच्‍या प्रजासत्‍ताक दिनी (Republic Day) देखील संप सुरू असताना कर्मचाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केले. यातून जमा झालेली रक्‍कम शासनास देणार असल्‍याचे प्रतिक्रीया कर्मचारींनी दिली. (jalgaon news ST employees will beg the government Beg in the bus station premises)

St Strike
St Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्‍या हाती कटोरे; प्रवाशांकडून भीक मागत शासनाचा निषेध

अडीच महिन्‍यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (St Strike) सुरू आहे. शासन यावर तोडगा काढत नसून उलटत एसटी प्रशासनातर्फे आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर (St Employee) कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्‍ये संतप्‍त भावना आहे. तणावात काही कर्मचारींचे जीव देखील गेले आहेत. तरी देखील राज्‍य शासन तोडगा काढत नसल्‍याची प्रतिक्रीया आंदोलक कर्मचारी देत आहेत.

संतप्‍त कर्मचारी कटोरे घेत प्रवाशांसमोर

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अद्यापही कायम असून शासन त्यांची दखल घेत नाही. दुखवट्यातील कर्मचाऱ्यांवर आज उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याने आज जळगावात (Jalgaon) भीक मांगो आंदोलन करण्यात आले. जमा केलेली भीक शासनाला देण्यात येणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com