निलंबनाच्या धक्क्याने कर्मचाऱ्याला भोवळ

निलंबनाच्या धक्क्याने कर्मचाऱ्याला भोवळ
st strike
st strike

चोपडा (जळगाव) : निलंबनाची नोटीस मिळाल्याच्या धक्क्याने चोपडा आगारातील संपात पहिल्या दिवसापासून सहभागी असलेल्‍या चालकाला भोवळ येऊन तब्येत अचानक खालावल्याने त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी (ता. २९) दुपारी दोनच्या सुमारास घडली.

st strike
मुलाने केला वडिलांचा खून; जेवणात उडदाची डाळ– भाकरी केल्याचा राग

चोपडा आगारातील चालक बी. एम. कोळी यांना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास आगार प्रमुख क्षीरसागर यांनी कार्यालयात बोलवले होते. त्या ठिकाणी त्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आली. नोटिसच्या धक्क्याने बी. एम. कोळी यांना भोवळ येऊन ते जमिनीवर कोसळले. हे पाहून उपस्थितांनी धावाधाव करत त्यांना तातडीने रिक्षातून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांच्यावर डॉ. सागर पाटील यांनी उपचार केले असून, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी कर्मचारी व नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

अन्‍य पाच जणांचे निलंबन

कोळी यांच्यासह अन्य पाच जणांना कामावर हजर न झाल्याबद्दल निलंबनाची नोटीस देण्यात आल्याचे आगारप्रमुख क्षीरसागर यांनी सांगितले. परंतु एकूण दहा जणांवर कारवाई केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com