स्टेट बँकेचा अजब फतवा.. शेकडो खाती निष्क्रिय होण्याची भिती

स्टेट बँकेचा अजब फतवा.. शेकडो खाती निष्क्रिय होण्याची भिती
State bank of india
State bank of india

जळगाव : अडावद (ता.चोपडा) येथील भारतीय स्टेट बँक शाखा क्रमांक २१३६ मध्ये गेल्या आठवड्यात्रपासुन अलिखित फतवा काढण्यात आला आहे. यानुसार खातेदारास २० हजार रूपयांच्या आतील भरणा तसेच १० हजार रूपयांच्या आतील रक्कम बँक शाखेतून मिळणार नाही; तर त्यासाठी ग्राहक केंद्रात जावून व्यवहार करण्याचा फतवा बँकेच्या कँशिअरने काढला आहे. (jalgaon-news-state-bank-of-india-branch-in-adawad-cashier-new-order-gramsabha-tharav)

ग्राहकांना बँकेच्या सुविधापासुन वंचित ठेवून बँकेचे ग्राहक तोडण्याचा प्रकार खुद्द बँकेकडूनच होत आहे. यामुळे येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी बँकेच्या मनमानी कारभारा विरोधात बहुमताने ठराव मंजूर करून बँकेच्या वरिष्ठांकडे ग्रामसभेचा ठराव पाठवून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

ग्रामसभेत बँकेविरूद्ध जनतेचा रोष

अडावद ग्रामपंचायतीची ग्रामसभा शनिवारी (ता.२८) लोकनियुक्त सरपंच भावना माळी यांच्या अद्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत उपसरपंच भारती महाजन, सदस्य जावेद खान, ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे, कृषी सहाय्यक प्रशांत पवार आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. शासनाचे जी.आर. आणि आलेले अर्जाचे लिपिक प्रेमराज पवार यांनी वाचन केले. आजच्या सभेत अडावद स्टेट बँकेच्या मनमानी कारभाराविषयी जनतेने मोठा रोष व्यक्त केला. एटीएम बंद ठेवणे, बँकेतील कार्ड स्वँप मशिन बंद ठेवून ग्राहकांना व्यवहारासाठी ग्राहक केंद्राची वाट दाखविणारी शाखा शेकडो खाते निष्क्रिय करण्याचा घाट घालून गावात नव्याने येणाऱ्या दुसऱ्या बँकेस आयते ग्राहक तर जोडायला भाग पाडत नाही; असा आरोप ग्रामसभेत ग्रामस्थांनी केला.

State bank of india
जिल्‍हा बँकेत सर्वपक्षीय पॅनल करण्यासाठीच प्रयत्‍न : माजी मंत्री खडसे

ठराव एकमुखाने मंजूर

इतर केंद्रावर व्यवहार केल्यास ग्राहकांना कमिशन चार्जेस द्यावे लागतात. तो आर्थिक भुर्दड सहन करावा लागतो. तरीही बँक ग्राहकांना ग्राहक केंद्राचा रस्ता दाखवित असल्याने बँक कर्मचाऱ्यांचे काही अर्थपूर्ण सटेलोटे तर बांधले नसल्याचा सवाल ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला. बँकेच्या विरोधातील हा ठराव ग्रामस्थांनी एकमुखाने मंजूर केला असुन त्याचा अहवाल महाप्रबंधक मुबंई, सहाय्यक महाप्रबंधक औरंगाबाद, क्षेत्रीय कार्यालय जळगावसह रावेर मतदार संघाचे खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com