नवीन चालकांच्‍या हाती स्‍टेअरींग..गोंधळानंतर जळगावातून धुळ्यासाठी पहिली बस रवाना

नवीन चालकांच्‍या हाती स्‍टेअरींग..गोंधळानंतर जळगावातून धुळ्यासाठी पहिली बस रवाना
St Bus
St Bus

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळातील कर्मचारी गेल्‍या पंधरा दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. कर्मचारी मागे हटत नसल्‍याने बससेवा पुर्ववत करण्यासाठी प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना आज एसटीचे स्‍टेअरींग हाती दिले. याला विरोध झाला मात्र बराच वेळ झालेल्‍या गोंधळानंतर धुळ्यासाठी पहिली बस रवाना करण्यात आली. (jalgaon-news-Steering-in-the-hands-of-new-drivers-and-first-bus-leaves-Dhule)

St Bus
धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा त्रास; प्रसंगावधानाने अनर्थ टळला

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे; या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी जवळपास पंधरा दिवसांपासून संपावर आहे. यामुळे बससेवा थांबलेली आहे. यात एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तोडगा निघत नसल्‍याने कर्मचारी संप मागे घेत नसून ठाम आहे. यामुळे अद्यापपर्यंत आंदोलन सुरूच आहे. मात्र आज पोलिस बंदोबस्‍तात सेवा सुरू केली.

प्रतिक्षा यादीतील उमेदवार रूजू

एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे चालक भरती प्रक्रीयेतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना कामावर बोलावून आज जळगावातून एसटी महामंडळाने सेवा सुरु करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज तब्‍बल १५ दिवसांनंतर दुपारी दीड वाजेच्‍या सुमारास जळगावहून धुळ्यासाठी पहिली बस (क्र. एमएच २०, बीएल ३९३६) जळगाव आगारातून बाहेर पडली.

कर्मचारींमध्‍ये मनसेचा सहभाग

एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु असताना प्रतिक्षा यादीतील चालक, वाहकाच्या तातडीच्या नियुक्तीला कर्मचारींनी विरोध दर्शविला. बस जावू देणार नाही; यासाठी मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात ठिय्या मांडला होता. यात मनसेचे कार्यकर्ते देखील काही सहभागी झाले होते. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चर्चा केली. ही चर्चा संपल्यावर ठिय्या आंदोलन मागे घेतला; परंतु, कर्मचारींनी विरोध कायम ठेवला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com