मुक्‍ताईनगरात ‘स्वराज्य ध्वज’ यात्रेचे आगमन; संत मुक्‍ताई मंदिरात पुजन

मुक्‍ताईनगरात ‘स्वराज्य ध्वज’ यात्रेचे आगमन; संत मुक्‍ताई मंदिरात पुजन
मुक्‍ताईनगरात ‘स्वराज्य ध्वज’ यात्रेचे आगमन; संत मुक्‍ताई मंदिरात पुजन
स्वराज्य ध्वज

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांच्या संकल्पनेतून स्वराज्य ध्वज कार्यक्रमाअंतर्गत संपुर्ण राज्यात फिरत असलेल्‍या ‘संदेश यात्रा’ मुक्‍ताईनगर आली. येथे आगमन झाल्‍यानंतर ध्‍वजाचे स्वागत व पुजन करण्यात आले. (jalgaon-news-Swarajya-Dhwaj-Yatra-at-Muktainagar-Worship-at-Sant-Muktratai-Temple)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ७४ मीटर उंच, ९६ बाय ६४ फुटांचा, ९० किलो वजन असलेला सर्वात उंच 'भगवा ध्वज' अर्थात ‘स्वराज ध्वज’ कर्जत जामखेड मतदारसंघातील खर्डा जवळील शिवपट्टण किल्ल्यावर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उभारण्यात येत आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील विविध ७४ धार्मिक, आध्यत्मिक स्थळी, स्मारक व गडकिल्ल्यांवर या स्वराज ध्वजाचे पुजन होत आहे

स्वराज्य ध्वज
गुजरात-बडोदा मालेगाव बसचा अपघात; ७ प्रवासी किरकोळ जखमी

मुक्‍ताई मंदिरात ध्‍वजाचे पुजन

संपुर्ण राज्यात सर्वसमावेशक ध्वजाचे पुजन सर्वांच्या हस्ते व्हावे, अशी लोकभावना असल्यामुळे महाराष्ट्र राज्यासह देशातील विविध ठिकाणी या ध्वजाचे पुजन व्हावे; या हेतूने ३७ दिवसाच्या या प्रवासात स्वराज्य ध्वज पुजन यात्रा १२ हजार किलोमिटर प्रवास करीत आज या ध्वजपुजन यात्रेचे येथे शहरात आगमन झाले. श्री संत आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान स्थळ कोथळी येथे या स्वराज ध्वजाचे आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे– खेवलकर यांनी ध्वजाचे पुजन केले.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com