कॉंग्रेसने पेटविली चुल अन्‌ भाजली पोळी

कॉंग्रेसने पेटविली चुल अन्‌ भाजली पोळी
कॉंग्रेसने पेटविली चुल अन्‌ भाजली पोळी
Jalgaon congress

यावल (जळगाव) : सातत्‍याने वाढत असलेले इंधन दरवाढीविरोधात कॉंग्रेसच्‍यातीने आज चुली पेटवा आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (jalgaon-news-tawal-panchayat-samiti-aria-congress-petrol-price-hike)

पेट्रोल व डिझेलची दरवाढ रोज होत आहे. शिवाय गॅसचे दर देखील टप्‍प्‍याटप्‍प्‍यात वाढत आहेत. यामुळे सामान्‍यांना मोठ्या प्रमाणात झळ पोहचत आहे. इंधन दरवाढीच्‍या विरोधात आतापर्यंत अनेक आंदोलन झाली असून, ती सुरूच आहेत. आज देखील कॉंग्रेसच्‍यावतीने यावल येथे आंदोलन करत केंद्रा शासनाचा निषेध केला.

Jalgaon congress
साडीची झोळी अन्‌ बांम्बूलेन्स ते ॲम्‍बुलन्‍स! वर्डीच्‍या विमान दुर्घटनेतील तो प्रसंग..

पोळी भाजत केला चहा अन्‌ भजी

यावल तालुका आणि शहर काँग्रेसतर्फे पंचायत समिती कार्यालयासमोर इंधन दरवाढ विरोधात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषदेचे गटनेते तथा काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली 'चुली पेटवा' आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महागाई विरोधात चुलीवर पोळी, भजे, चहा असा इतर स्वयंपाक करून सर्वच महिलांनी निषेध केला. यावेळी आमदार शिरीष चौधरी, प्रभाकर सोनवणे यांनी मोदी आणि केंद्र सरकारवर आपल्या शैलीत भाषणातून जोरदार हल्ला चढवला. आंदोलन चालू असतांना रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या आणि उपस्थित सामान्य जनतेनेही आंदोलनास पाठींबा दर्शवला. आंदोलनात इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, प.स. गटनेते शेखर पाटील, अनुसूचित जाती काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षा चंद्रकला इंगळे, शहराध्यक्ष कदिर खान, वढोदा सरपंच संदीप सोनवणे, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल आदी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com