मुक्ताईनगरमध्ये एसटी कर्मचारीतर्फे थाळीनाद

मुक्ताईनगरमध्ये एसटी कर्मचारीतर्फे थाळीनाद
मुक्ताईनगरमध्ये एसटी कर्मचारीतर्फे थाळीनाद
एसटी

जळगाव : राज्‍य परिवहन महामंडळाचे कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. या संपादरम्‍यान मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दररोज वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले जात आहे. यात मुक्‍ताईनगर आगाराच्‍या बसस्‍थानकात सर्व कर्मचारींनी मिळून थाळीनाद आंदोलन केले. (jalgaon-news-Thalinad-by-ST-employee-in-Muktainagar-depot)

एसटी
नंदुरबारला मिरचीची आवक वाढली; दरही मिळतोय चांगला

राज्‍य परिवहन महामंडळाचे कर्मचारींनी महामंडळाचे राज्‍य शासनात विलीगीकरणाच्‍या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत. संपाचा आठवा दिवस उजाळला असताना शासनाकडून अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. विशेष म्‍हणजे शासनाने संपकरी कर्मचारींवर कारवाईचा बडगा उगारला असून अनेक कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहेत. असे असताना देखील कर्मचारी संप मार्ग घेण्याच्‍या मार्गावर नाहीत. उलट शासनाच्‍या विरोधात वेगवेगळे आंदोलन करत आहेत.

थाळीनादने लक्ष वेधण्याचा प्रयत्‍न

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर एसटी आगारातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी थाळीनाद आंदोलन केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही कुठला तोडगा निघत नसल्याने एसटी कर्मचारी संतप्त झाले असून थाळीनाद करत एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com