Pachora: पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत तीन वर्ष अश्लील चाळे; नराधम पित्यास अटक

पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत तीन वर्ष अश्लील चाळे; नराधम पित्यास अटक
Jalgaon Pachora News
Jalgaon Pachora NewsSaam tv

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील एका गावात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील पंधरा वर्षीय अल्पवयीन पोटच्या मुलीसोबत गेल्या तीन वर्षांपासून (Crime) अश्लील चाळे करून तिच्‍यासह आईला मारण्याची व घरातून हाकलून देण्याची धमकी देणाऱ्या नराधम पित्यास पोलिसांनी (Police) अटक केली आहे. या घटनेमुळे सारा तालुका सुन्न व संतप्त झाला असून अशा नराधमास कठोर शिक्षेची मागणी समाज मनातून केली जात आहे. (Pachora Crime News)

Jalgaon Pachora News
पाण्यावर तरंगणारा तांदूळ प्लास्टिक नव्हे; तर अनेक आजारांवर उपयुक्त पौष्टिक फोर्टीफाईड तांदूळ

पीडित बालिकेची आई मोलमजुरी व बकऱ्या चारण्याचे (Jalgaon) काम करते. वडीलही मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. तर त्‍यांची पंधरा वर्षीय पीडित मुलगी ही आईला घर कामात मदत करते. सप्टेंबर 2019 मध्ये पीडित बालिका बारा वर्षांची असताना नराधम बापाने घरी कोणी नसताना मोबाईलवरील अश्लील व्हिडिओ पीडीतेला दाखवायचा. तसेच ती कपडे बदलवित असताना तिच्या अंगावरून वेगळ्याच भावनेने हात फिरवत असे. हा प्रकार आईला अथवा इतरांना सांगितला तर तुम्हा दोघांना मारठोक करेल व आईला घरातुन हाकलुन देईल अशी धमकी नराधम पिता देत होता. त्यामुळे पिडीत बालिकेने पित्याकडून होणारा सारा अत्याचार सहन केला. त्यामुळे नराधमा पित्याचा किळसवाणा प्रकार वाढत गेला.

अखेर आईला सांगितला संपुर्ण प्रकार

दरम्‍यान 13 रोजी पीडितेची आई बकऱ्या चारण्यासाठी शेत शिवारात गेली होती. या दरम्‍यान नराधम बापाने पीडितेस अंगावरील कपडे काढ व जवळ बसुन मोबाईलवरील अश्लील व्हिडिओ पहा असे सांगितले. परंतु पिडीत बालिकेने नकार दिल्याने नराधम बाप शिवराळ भाषेत बोलत घराबाहेर निघून गेला. त्यामुळे पिडीत बालिका घाबरली व ती घरात रडत बसली. पिडीतेची आई बकऱ्या घेऊन घरी आल्यानंतर पिडीतेला जास्तच रडू आले व ती आईला मिठी मारत हूंदके देऊ लागली. तेव्हा आईने मुलीला रडण्याचे कारण विचारले. पिडीतेने स्वतः सोबत बापाने केलेला किळसवाणा प्रकार कथन केला. त्यामुळे पिडीतेची आई भयभीत झाली तिने आपल्या भाऊ व आईला बोलावून घेत सारा प्रकार सांगितला. यानंतर त्यांचे सोबत पोलीस स्टेशनला येऊन पती विरूध्द पाचोरा पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी विनयभंग, धमकावणे व पोस्को अंतर्गत नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com