मोटारसायकलवरून येत बसवर केली दगडफेक; चालक किरकोळ जखमी

मोटारसायकलवरून येत बसवर केली दगडफेक; चालक किरकेाळ जखमी
मोटारसायकलवरून येत बसवर केली दगडफेक; चालक किरकोळ जखमी
st strike

पारोळा (जळगाव) : चार दिवसांपूर्वी सुरू झालेली पारोळा– अमळनेर (Amalner) बसवर अज्ञात दोन इसमांनी दगडफेक केली. यात बसचे नुकसान झाले असून चालक किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत पारोळा पोलिसात (Parola Police) अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (jalgaon-news-Throwing-stones-at-bus-coming-from-a-motorcycle)

st strike
मध्‍यरात्रीनंतर कामावरून घरी आला..त्याने बाहेरून कडी लावली अन्‌ संपविली जीवनयात्रा

जळगाव (Jalgaon) जिल्‍ह्यातील चार आगारांमधून बससेवा सुरू केली आहे. काही चालक व वाहक कामावर रूजू झाल्‍याने सेवा हळूहळू सुरू होत आहे. परंतु, काही जणांकडून बससेवा खंडीत व्‍हावी; या उद्देशाने दगडफेरीचे प्रकार केले जात आहे. अमळनेर– पारोळा बसवर झालेल्‍या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. शिवाय चार दिवसांपुर्वी सुरू झालेल्या बसमुळे विद्यार्थ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला होता. शैक्षणिक दृष्ट्या त्यांचे होणारे नुकसान वाचले व आर्थिक पिळवणूक थांबली होती. त्यामुळे आनंदाचे वातावरण होते. परंतु बसवर दगडफेक केल्यामुळे अज्ञात इसमाने विरुद्ध विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मोटारसायकलवरून येत केली दगडफेक

बस चालक शांताराम नथु मोरे यांनी फिर्याद दिली असून त्‍यानुसार बस (क्र. एमएच. 40, एन 9082) अमळनेर आगारातून साडेअकराला पारोळा येथे आली होती. दरम्यान परतीच्या मार्गावर अमळनेरकडे जात असताना भोकरबारी गावापुढे दुपारी तोंडाला रुमाल बांधलेले दोन अज्ञात इसम मोटरसायकलने बसचा पाठलाग करत आले. त्यांनी समोरून बसवर ड्रायव्हर साईडच्या दिशेने दगडफेक करत बसचा काच फोडून पळ काढला. यावेळी चालकास किरकोळ दुखापत झाली.

त्‍यांचा शोध सुरू

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवासी घाबरले होते. याबाबत सदर इसमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते मोटरसायकलने पसार झाले. घटना कळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक संतोष भंडारे व त्यांच्या टीमने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून अज्ञात दोन जणांविरुद्ध सरकारी वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणीबाबत सरकारी कामात अडथळाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सामान्य ग्राहकांनी बसवर झालेल्या दगडफेकमुळे नाराजी व्यक्त केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.