बनावट विदेशी मद्याची वाहतूक; मुक्‍ताईनगरात जप्‍तीची कारवाई

बनावट विदेशी मद्याची वाहतूक; मुक्‍ताईनगरात जप्‍तीची कारवाई
liquor Seizure
liquor Seizuresaam tv

मुक्ताईनगर (जळगाव) : बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यास राज्य उत्पादन विभागाच्या भुसावळच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून बनावट विदेशी मद्यसाठा व एक मोटरसायकल जप्त करत यास ताब्‍यात घेतले आहे. (jalgaon news Transport of counterfeit foreign liquor Seizure action in Muktainagar)

liquor Seizure
Sadabhau Khot: ग्लास सुरू अन्‌ क्लास बंद करायचे धोरण राज्य सरकारचेः सदाभाऊ खोत यांची टीका

मुक्ताईनगर -बोदवड (Muktainagar) रस्त्यावर मोटरसायकलने बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती भुसावळच्‍या राज्य उत्पादन शुल्क विभागाला (State Excise Department) मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सापळा रचत मुक्ताईनगर -बोदवड रस्त्यावर मोटरसायकलने बनावट विदेशी मद्याची वाहतुक करतांना पियुश हळदे यास अटक केली. पियुश गणेश हळदे (वय २५ वर्ष रा.मुक्ताईनगर) व अनंत गणेश वाढे (रा.चिखली, ता.मुक्ताईनगर) यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांर्तगत कारवाई करुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

१ लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्‍त

तपासात हॉटेल साई गजानन ढाबा येथुन बनावट विदेशी मद्यसाठा व मोटरसायकल असा १ लाख २ हजार ८६२ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणात मद्य तस्करांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश सोनार, विभागिय पथकाचे जवान व वाहनचालक सागर देशमुख, सहाय्यक . दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान विठ्ठल हाटकर यांच्या पथकाने केली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com