जळगावात साकारले जाताय तुरटीचे बाप्‍पा; पर्यावरण पुरक मुर्तीने जलप्रदुषण रोखणार

जळगावात साकारले जाताय तुरटीचे बाप्‍पा; पर्यावरण पुरक मुर्तीने जलप्रदुषण रोखणार
जळगावात साकारले जाताय तुरटीचे बाप्‍पा; पर्यावरण पुरक मुर्तीने जलप्रदुषण रोखणार
Ganesh Festival

जळगाव : गणेशोत्सव काळात प्‍लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित केल्या जातात. परिणामी जलप्रदूषण होते. ते टाळण्यासाठी जळगावातील ममता काबरा यांनी द्रवरूप तुरटीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारली असून मूर्तीच्या विसर्जनाने नदी पात्रात पाणी शुद्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (jalgaon-news-Turti-ganesh-realized-in-Jalgaon-Environmentally-friendly-idols-will-prevent-water-pollution)

जळगाव शहरातील ममता काबरा यांनी सन २००५ पासून तिरुपती एलम हा तुरटी बनवण्याचा कारखाना चिंचोली शिवारात सुरू केला. मात्र मागील दोन वर्षांपासून तुरटीपासून काही तरी नाविन्यपूर्ण केले पाहिजे असे मनात सतत येत असताना तुरटीपासून गणपती बनवण्याचे त्‍यांनी ठरविले. तसेच संपूर्ण राज्यात प्रत्येक घरात गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यावेळेस मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते आणि तुरटीपासून गणेशाची मूर्ती बनवली गेली; तर त्यापासून पाणी शुद्ध होण्यास मदत लाभेल असा विचार करून एप्रिल २०२१ पासून मूर्ती बनवण्याचे सराव सुरु करण्यात आला.

अशी बनविली जाते मुर्ती

सुरुवातीचे दोन महिने काही समजत नव्हते. त्यानंतर ज्‍या काही चुका होत गेल्‍या त्याला समजून अखेर गणेशाची मूर्ती बनवण्यात यश प्राप्त झाले. सुरुवातीला तुरटी पावडर गरम करून वितळविण्यात येते आणि त्याची एक विशिष्ट एकाग्रता राखली जाते. जेव्हा तुरटी वितळून घट्ट होण्यास सुरुवात होते. त्यावेळी त्याला साच्यांमध्ये टाकला जातो. त्यानंतर ३ ते ४ तासांनंतर जेव्हा तुरटी पूर्णपणे घट्ट होऊन सुकते. तेव्हा साच्यातून गणपणीची मूर्ती बाहेर काढली जाते. त्यानंतर मूर्तीला टॅब्लेट कोटिंग पावडर चढवल्यानंतर केवळ आभूषणांना गोल्डन कलर देण्यात येतो. या व्यतिरिक्त कोणताही रंग वापरण्यात येत नसल्याने ९९ टक्के तुरटी तर १ टक्केच कलर वापरण्यात आला. त्यामुळे नक्कीच पाणी शुद्ध राहील असे ममता काबरा यांनी सांगितले.

Ganesh Festival
भाजपनंतर मनसेने हाती घेतले टाळ..म्‍हणाले ‘उद्धवा अजब तुझे सरकार’

गावातील महिलांना मिळाला रोजगार

सदर कामासाठी कंपनीमध्ये ७ महिला व २ पुरुष कर्मचारी कामाला आहेत. सर्व स्थानिक गावातील असल्याने गावातील लोकांना कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये रोजगार मिळाला असल्याने कामगार ही मन लावून तिथे कामे करतात.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com