बालिकेच्‍या अंथरूणात दोन साप..गळ्यावर दंश केल्‍याने काही क्षणात मृत्‍यू

बालिकेच्‍या अंथरूणात दोन साप..गळ्यावर दंश केल्‍याने काही क्षणात मृत्‍यू
बालिकेच्‍या अंथरूणात दोन साप..गळ्यावर दंश केल्‍याने काही क्षणात मृत्‍यू
Snake Bite

पाचोरा (जळगाव) : रात्री आईजवळ अंथरूणात चार वर्षीय बालिका झोपली होती. परंतु, पहाटेच आईच्‍या कुशीत रडणारी बालिका काही क्षणातच आई व परिवारापासून दूर गेली. या प्रकाराने संपुर्ण परिवार निशब्‍द झाला आहे. (jalgaon-news-Two-snakes-in-bead-Girl-dies-of-snake-bite)

Snake Bite
आठ महिन्‍याच्‍या गर्भवतीला दुचाकीची समोरून धडक; महिलेचा मृत्‍यू

भोकरी (ता. पाचोरा) येथील अलिजा इमरान काकर असे मयत बालिकेचे नाव आहे. चार वर्षीय अलिजा आईसोबत झोपलेली असताना अंथरुणातच विषारी सर्पाने दंश केला. रात्री कुशीत येवून झोपलेली चिमुकली आपल्‍याला सोडून जाईल; याचा विचार देखील आईला करवत नाही. चिमुकलीच्‍या मृत्यूने निशब्‍द झालेल्‍या आईच्‍या डोळ्यातून अश्रूंच्‍या धारा वाहत आहे. या प्रकाराने वरखेडी व भोकरी गावावर शोककळा पसरली.

मुलीने आईला उठविले

आईसोबत घरात झोपली असताना सोमवारी (ता. 15) पहाटे काहीतरी चावल्याने ती जागी झाली. तिने आईला सांगितल्यावर आई– वडिलांनी उठून बघितले असता अलिजा झोपलेल्या अंथरुणावर दोन सर्प दिसले. त्यापैकी एकाने अलिजाच्या गळ्याजवळ दंश केला होता. तिला उपचारासाठी दवाखान्‍यात नेले. परंतु उपचार सुरू असतानाच अलिजाचा मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com