लसीकरणानंतर वृद्धाला आले चक्कर; केंद्रावरच उपचाराविना सव्‍वा तास अखेर त्‍यांचा मृत्‍यू
Death

लसीकरणानंतर वृद्धाला आले चक्कर; केंद्रावरच उपचाराविना सव्‍वा तास अखेर त्‍यांचा मृत्‍यू

लसीकरणानंतर वृद्धाला आले चक्कर; केंद्रावरच उपचाराविना सव्‍वा तास अखेर त्‍यांचा मृत्‍यू

जळगाव : शहरातील समतानगर धामणवाड्यातील काशीनाथ सोनार (वय ७५) लसीकरणानंतर चक्कर येऊन लसीकरण केंद्रातच पडल्याची घटना घडली. गणपती हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान रविवारी (ता. ५) पहाटे दोनच्या सुमारास काशीनाथ सोनार यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. लसीकरणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, इनकॅमेरा शवविच्छेदन होऊन पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (jalgaon-news-vaccination-center-corona-vaccine-after-death-old-man)

मायादेवीनगरातील रोटरी भवन येथील केंद्रावर लसीकरणानंतर प्रकृती खालावल्याने सोनार यांच्यावर उपचारास विलंब झाला. तसेच लसीकरणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप काशीनाथ सोनार यांचा मुलगा जितेंद्र सोनार यांनी केला. तसेच इनकॅमेरा शवविच्छेदन व्हावे व चौकशीची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. वैद्यकीय समिती समक्ष शवविच्छेदनाचे छायाचित्रणासाठी फोटोग्राफर न मिळाल्याने तब्बल चार तास मृतदेह व नातेवाईक जिल्हा रुग्णालयात ताटकळत होते. अखेर दुपारी एकला इनकॅमेरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. डोक्यात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लसीकरण केंद्राचा निष्काळजीपणा

जितेंद्र सोनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील काशीनाथ सोनार, आई हिराबाई लशीचा पहिला डोस घेण्यासाठी शनिवारी रोटरी भवन (मायादेवीनगर) केंद्रावर गेले होते. लस घेतल्यानंतर काशीनाथ सोनार यांना चक्कर आले व ते कोसळले, तसेच ब्लडप्रेशरचा त्रास वाढला होता. त्यांच्यावर प्रथमोपचाराची माणुसकीदेखील केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी दाखविली नसल्याचा आरोप होत आहे. तब्बल पाऊण तास काशीनाथ सोनार केंद्रावर होते.

Death
खळबळजनक ः एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

..तर कदाचित ते वाचले असते

लसीकरण केंद्रावर वेळेवर उपचार मिळाले असते तर काशीनाथ सोनार यांचा जीव वाचला असता; मात्र केंद्रावर तशा कुठल्याच सुविधा नसल्याने व त्यांनी विलंब केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप जितेंद्र सोनार यांनी केला. सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, शिवाजी धुमाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांचे म्हणणे समजून घेत, पोलिसांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची तयारी केली.

लसीकरण केंद्रावर लस घेतल्यानंतर कुणाला काही त्रास झाल्यास तत्काळ उपचार व्हावे किंवा उपचाराची सुविधा असावी, जेणेकरून माझ्या वडिलांप्रमाणे इतर कुणाचा मृत्यू होणार नाही.

- जितेंद्र सोनार

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com